आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात पोलिओचे नवे प्रकरण आले उजेडात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात शनिवारी पोलिओचे एक प्रकरण उजेडात आले आहे. वास्तविक पाकिस्तानने पोलिओचे उच्चाटन झाल्याचा दावा केला होता; परंतु हा दावा किती खोटा आहे, हे अनेक वेळा दिसून आले. शनिवारीदेखील दाव्याच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह लागले.
पेशावरमध्ये नवीन केस आढळून आली. हयाताबाद येथील दीड वर्षाच्या मुलास पोलिओ असल्याचे सांगण्यात आले. गेल्या वर्षी पाकिस्तानात ३०५ नवीन केसेस आढळून आल्या होत्या. अफगाणिस्तान, नायजेरिया आणि पाकिस्तान या तीन देशांत अजूनही पोलिओ आढळून येतो. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या पोलिओमुक्ती मोहिमेला
खीळ बसली आहे.