आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाक न्यायालयाकडून व्हॅलेंटाइन डेवर बंदी, इस्लामाबाद हायकोर्टमध्‍ये प्रथमच अशी याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानात यावर्षी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार नाही. इस्लामाबाद हायकोर्टाने त्यावर बॅन लावला आहे. - ( फोटो प्रतिकात्मक) - Divya Marathi
पाकिस्तानात यावर्षी व्हॅलेंटाइन डे साजरा केला जाणार नाही. इस्लामाबाद हायकोर्टाने त्यावर बॅन लावला आहे. - ( फोटो प्रतिकात्मक)
इस्लामाबाद - पाकिस्तानातील उच्च न्यायालयाने सोमवारी व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यास बंदी घातली आहे. सोशल मीडियावरील त्याचे वाढते प्रस्थ पाहता व्हॅलेंटाइन डे साजरा करणे हे गैरइस्लामिक आहे, अशी विनंती करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात सादर झाली असता न्यायालयाने आपले हे मत दिले आहे. व्हॅलेंटाइन डे साजरा न करण्याचा आदेश इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. अब्दुल वाहिद नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने ही याचिका दाखल केली होती. 

याचिकाकर्त्याने न्यायालयाला विनंती केली की, व्हॅलेंटाइन डे हा काही मुस्लिम परंपरेचा भाग नाही. सोशल मीडियावर त्याच्या होत असलेल्या प्रमोशनवरही बंदी घालावी. न्यायालयाने ही जनहित याचिका स्वीकारून प्रशासनाला हे आदेश दिले आहेत की, त्यांनी देशभरात या डेच्या विरुद्ध कठोर कृती करावी. या आदेशाचा त्वरित परिणाम सुरू झाला आहे. माहिती मंत्रालयाने आणि पाक इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अॅथॉरिटी आणि मुख्य आयुक्त इस्लामाबाद यांनी या आदेशावर अंमलबजावणी होईल, असे आश्वासन दिले.
 
शासनाशिवाय मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांनीदेखील व्हॅलेंटाइन डेचे सेलिब्रेशन त्वरित थांबवावे, असा कडक इशारा दिला आहे. पाकमध्ये नेहमीच धार्मिक पक्ष युवावर्गाला धमकावून दहशत पसरवण्याचा प्रयत्न करत असतात. पण उच्च न्यायालयाने डेच्या सेलिब्रेशनवर बंदी घातली, असे यंदा पहिल्यांदाच घडले आहे. गेल्या वर्षी अध्यक्ष मेमन हुसेन यांनी पाकची संस्कृती पाहता हा दिवस साजरा न करण्यासाठी आवाहन केले होते.  पाकची राष्ट्रीय ओळख आणि संस्कृती ध्यानात ठेवावी असेही म्हटले होते.  
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...