आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीआेकेमधील निवडणूक शरीफ यांच्यासाठी आव्हान, मोदींशी मैत्रीमुळे लक्ष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानव्याप्त काश्मीर भागात २१ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. स्वायत्त सरकारसाठी होणारी निवडणूक पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी असलेली मैत्री भोवणार असल्याचे दिसते.

वास्तविक पीआेकेमधील सरकार हे पाकिस्तानच्या केंद्रातील सरकारच्या समर्थन व पाठिंब्यावर चालते. परंतु यंदा परिस्थिती भिन्न दिसून येत आहे. प्रांतात शरीफ विरोधकांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. ‘मोदी का जो यार है , गद्दार है, गद्दार है ’ अशा घोषणा देऊन पाकिस्तान पिपल्स पार्टीने (पीपीपी) अतिशय आक्रमक प्रचार मोहीम राबवली आहे. पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षांनी शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लिगला (नवाज) पिछाडीवर टाकले आहे. निवडणुकीत पीएमएल-एन पक्ष विजय झाल्यास प्रांतात शरीफ यांच्या विचारांचे सरकार आले आहे व ते मोदी यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्यास अनुकूल आहे, असा संदेश जाण्याची भीती पीपीपीचे प्रमुख बिलावल भुट्टो-झरदारी यांनी मीडियासमोर बोलून दाखवली. पीपीपीच्या काही नेत्यांनी ही आक्रमक भूमिका जाणीवपूर्वक घेतली आहे. अशा भूमिकेमुळे लष्कराशी जवळीक साधता येईल. त्याचबरोबर त्यातून भविष्यातील राजकीय खेळी करणेही सोपे होईल, असे पीपीपीच्या नेत्यांना वाटते.

‘आयएसआयचा हात नाही’
ढाक्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात गुप्तचर संस्था आयएसआयचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने फेटाळून लावला आहे. हा आरोप बिनबुडाचा, बेजबाबदार व चिथावणीखोर असल्याचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नफिस झकेरिया यांनी म्हटले आहे. बांगलादेशने ढाका हल्ल्यात आयएसआयचा देखील हात असावा, असा संशय व्यक्त केला होता. पाकिस्तान नेहमीच अशा प्रकारची वक्तव्ये करत आला आहे, असे बांगलादेशचे माहिती व प्रसारणमंत्री हसन उल-हक यांनी दिली.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...