आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानचा दावा: कुलभूषण जाधव यांच्याकडून अतिरेक्यांची माहिती मिळतेय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद  - पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले कुलभूषण जाधव यांच्याकडून देशातील अनेक दहशतवादी हल्ल्यांची माहिती मिळत आहे, असा दावा पाकिस्तानने मंगळवारी केला.  
 
देशात अलीकडच्या काळात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत जाधव सातत्याने अत्यंत महत्त्वाची माहिती देऊ लागले आहेत, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकेरिया यांनी ‘डॉन’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. जाधव यांनी नेमकी कोणती गोपनीय माहिती पुरवली आहे, याचा तपशील मात्र झकेरिया यांनी दिला नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर १८ रोजी स्थगिती आणली होती; परंतु या प्रकरणात अद्यापही तपासाची गरज आहे, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. जाधव हेर असल्याचे आमच्याकडे ठोस पुरावे आहेत, असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे, असे पाकिस्तानचे अॅटोर्नी अश्तर आैसफ यांनी म्हटले आहे.  आैसफ म्हणाले, पाकिस्तानकडे जाधव यांच्याविषयी काही माहिती आहे. ही माहिती सुरक्षेच्या कारणास्तव जाहीर केली जाऊ शकत नाही. पाकिस्तानकडे ठोस पुरावा आहे. आता पुन्हा आंतरराष्ट्रीय कोर्टात याबद्दलची सुनावणी सुरू होईल. तेव्हा पाकिस्तान आपल्याजवळील पुरावे सादर करेल. त्यामुळे १८ मे रोजी भारताने स्थगिती मिळवली होती. त्यात भारताचा विजय किंवा पाकिस्तानचा पराभव अजिबात नाही. आगामी सुनावणीत मात्र पाकिस्तान विजयी होईल, असा दावा आैसफ यांनी केला.  
 
प्रतिबंधित अतिरेकी संघटना फेसबुकवर सक्रिय
दहशतवादासंदर्भातील पाकिस्तानचा ढोंगीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. अामच्या देशात अतिरेक्यांचे वास्तव्य नसल्याचा कांगावा पाकिस्तान करत असले तरी सुमारे ४१ पेक्षा जास्त बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना पाकिस्तानातून फेसबुकवर सक्रिय असल्याचे उघडकीस आले आहे. यात पाकिस्तानी तालिबान, लष्कर-ए-जागवीसारख्या संघटनांचा समावेश आहे. फेसबुकवर या संघटनेचे शेकडो पेजेस, ग्रुप्स आणि प्रोफाइल आहेत. त्या माध्यमातून या संघटना त्यांच्या अतिरेकी विचारधारेचा सर्रास प्रचार आणि प्रसार करत आहेत. भारताविरोधात दहशतवादी कट रचून नुकसान पोहोचवणाऱ्या यापैकी अनेक संघटना असून त्या फेसबुक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताविरोधात गरळ ओकत आहेत. पाकिस्तानी माध्यमांनुसार, पाकिस्तानात ६४ अतिरेकी संघटनांवर बंदी आहे. 
 
अतिरेक्यांचे मुख्य लक्ष्य अजूनही जम्मू-काश्मीर  
फेसबुकवरील बहुतांश पेेजेसवर गतकाळात मारल्या गेलेल्या अतिरेक्यांचा गवगवा करण्यात आला आहे. काही संघटना तुरुंगात कैद दहशतवाद्यांना सोडवण्यासाठी अभियान चालवत आहेत, तर अनेक प्रतिबंधित संघटनांनी जम्म्ू-काश्मीरवरच निशाणा साधला आहे.  
 
 
}     ६४ प्रतिबंधित अतिरेकी संघटना  
}     ४१ फेसबुकवर सक्रिय  
}    १.६० लाख युजर्सचे लाइक्स  
}    ४० टक्के युजर्स एएसडब्ल्यूजेचे समर्थक  
}    फेसबुकवरील सर्वाधिक पेजेसच्या संघटना  
}     २०० पेज अहले सुन्नत वल जमात  
}     १६० पेज जिये सिंध मुत्ताहिदा महज  
}     १४८ पेज सिपह-ए-सहाबा  
}     ५४ पेज बलुचिस्तान स्टुडंट्स ऑर्गनायझेशन 
}     ४५ पेज सिपह-ए-मोहम्मद
 
गेल्या महिन्यात शिक्षा, आेढवली होती नाचक्की 
जाधव (४६) यांना पाकिस्तानच्या लष्करी कोर्टाने गेल्या महिन्यात देशविरोधी तसेच हेरगिरीचा ठपका ठेवत दोषी ठरवले. त्यानंतर मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती. आंतरराष्ट्रीय कोर्टात त्यावर स्थगिती मिळवण्यात भारताला यश आले होते. या प्रकरणात पाकिस्तानची नाचक्की झाली होती. पाकिस्तानला हा खटला योग्य प्रकारे हाताळता आला नाही, अशी टीका जनतेकडूनही ऐकावी लागली होती. अॅटोर्नी खावर कुरेशी यांनी हा खटला आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडला होता.  
बातम्या आणखी आहेत...