आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लश्करने घडवून आणला उरी हल्ला, PAK मधील पोस्टवरही छापले, वृत्तपत्राचा दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानच्या गुजरांवाला शहरात काही पोस्टर लागलेले समोर आले आहे. त्यात लश्कर ए तोयबान उरी हल्ला घडवून आणल्याचे छापलेले आहे. हे पोस्टर उरी हल्ल्यात पाकचा हात असल्याचे पुरावे समजले जाऊ शकतात. उरी हल्ल्यामागे पाकमधील दहशतवादी संघटनांचा हात असल्याचा भारताचा दावाही यामुळे अधिक ठोस झाला आहे. पाकने हा दावा फेटाळला होता.
सीमेपलिकडून घुसखोरी केलेल्या दहशतवाद्यांनी 18 सप्टेंबरला उरीच्या आर्मी ब्रिगेड हेडक्वार्टरवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये 20 जवान शहीद झाले होते. भारतीय लष्कराने चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. गुजरांवाला येथीलच एका व्यक्तीचे नाव या पोस्टरवर होते.

वृत्तपत्राचा दावा...
- 'द इंडियन एक्सप्रेस' च्या वृत्तानुसार पोस्टर्समध्ये गुजरांवाला येथील राहणाऱ्या मोहम्मद अनसला हल्ल्याचा जबाबदार ठरवले आहे. अनस अबू सिराकाच्या नावाने ऑपरेट करत होता.
- वृत्तपत्रातील वृत्तानुसार लोकांना लश्करच्या नमाजमध्ये बोलावले जात होते.
- लश्करने अबू सिराकाला एक वीर असे संबोधले आहे.
- पोस्टरर्समध्ये जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफीज सईदचा फोटोही आहे. जमात ही लश्करचीच पॅरेंट टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे.
- पोस्टरोवर लिहिले आहे, "घायबाना नमाज जनाजा (अंतिम संस्कार) बिना बॉडी के बड़ा नुल्लाह में किया जाएगा.. इसमें हाफिज सईद भी भाषण देगा।" बडा नुल्लाहदेखिल पंजाबच्या गुजरांवालाच मध्ये आहे.

भारताने केला होता दावा
- उरी हल्ल्यामागे जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा दावा भारताने केला होता.
- तपास अधिकाऱ्यांना लश्कर ए तोयबाच्या कमांडरबरोबर बोलल्यानंतर काही पुरावे हाती आले आहेत.
- एनआयएदेखिल या प्रकरणात मोठ्या दहशतवादी संघटनेच्या सहभागाचाही तपास करत आहे.
- दहशतवाद्यांकडेही पाकचे सील असलेली औषधे, इंजेक्शनचे सिरींज आणि अन्नपदार्थ सापडले होते.
बातम्या आणखी आहेत...