आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानी पोलिसांनी 300 संशयितांना केली अटक, लाहोर बाॅम्बस्फोट प्रकरण, अफगाणांवर संशय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - सुफी दर्ग्यावरील आत्मघातकी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानच्या पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३०० संशयितांना रविवारी अटक करण्यात आली. त्यात बहुतेक अफगाणिस्तानातील आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलेल्या एकूण संशयितांची संख्या आता ३५० वर गेली आहे. गेल्या सोमवारी दर्ग्याला लक्ष्य करण्यात आले होते. त्यात ८८ जणांचा मृत्यू तर २०० जखमी झाले होते. त्या हल्ल्यानंतर पोलिसांनी धाडसत्र राबवले. 
 
त्यात अफगाणिस्तान वंशाच्या लोकांना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून येते. शनिवार व रविवार दरम्यान अटक केलेल्या लोकांमध्ये २०० अफगाण व पश्तूनचे आहेत. त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. त्यांना घर भाड्याने देणाऱ्या लोकांनाही पोलिसांनी अटक केली आहे.  
 
दर्ग्याच्या परिसरातील सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे. तैनात जवानांच्या संख्येत वाढ झाली आहे. सध्या पोलिसांनी आेळखीसाठी बायोमेट्रिक यंत्राचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. त्यात आेळख नसलेल्या लोकांना सरळ अटक केली जात आहे. काही संशयितांच्या घरातून बेकायदा शस्त्रे देखील आढळून आली आहेत, असे पोलिसांनी सांगितले. दर्ग्यावरील हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.  

कारवाईत ११ अफगाणी दहशतवाद्यांचा खात्मा
पाकिस्तानच्या वायव्येकडील आदिवासी भागात सुरक्षा दल व दहशतवादी यांच्यातील धुमश्चक्रीत ११ दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ही घटना सापारकोट व पारा चामकनी भागात घडली. घटनेत दोन जवान जखमी झाले. कुर्रम भागात घुसण्याचा प्रयत्न करताना सुरक्षा दलाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा ही चकमक उडाली. पाकिस्तानने इसिसच्या विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली.
 
बातम्या आणखी आहेत...