आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात 15 किलोचा बॉम्ब केला निकामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - पाकिस्तानातील उत्तर पश्चिम सीमेवरील आणि खैबर खिंडीजवळील मोठे शहर पेशावर येथे सुरक्षा दलांनी सोमवारी परदेशी मालाचा हब असलेल्या  येथील कारखाना बाजार भागातील एका ढकलगाडीत ठेवलेला १५ किलो वजनाचा एक शक्तिशाली बॉम्ब निकामी केल्याने मोठा अनर्थ टळला असला. मात्र यामुळे पाकमध्ये दहशतीचे, भीतीचे वातावरण तयार झाले आहे.  हा बॉम्ब कुणी पेरलेला होता, ते काही अद्याप स्पष्ट झाले नाही.  मात्र, या शक्तिशाली बॉम्बचा दूर नियंत्रकाच्या साहाय्याने स्फोट घडवून आणण्याची अतिरेक्यांची योजना होती, अशी माहिती वृत्तसंस्थांनी दिली आहे. एका ढकलगाडीत एक बॅटरीसदृश वस्तू बेवारस अवस्थेत असल्याची माहिती मिळताच बॉम्बशोधक पोलिस पथक तेथे लगेचच पोहोचले व पथकाने तो बॉम्ब निकामी केला.  
बातम्या आणखी आहेत...