आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान करणार दहशतवाद्यांचे मन:परिवर्तन, सिंध प्रांतातील तुरुंगात बंद असलेल्या अतिरेक्यांपासून सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची- जगभरात अतिरेकी पाठवणाऱ्या पाकिस्तानने आता अतिरेक्यांच्या मन:परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात सिंध प्रांतातील तुरुंगात बंद असलेल्या जवळपास ३०० अतिरेक्यांपासून होत आहे. द डॉनच्या अनुसार या अतिरेक्यांचे मनोवैज्ञानिक तपासणी केली जाईल आणि त्यांना दहशतवादाच्या मार्गापासून दूर नेण्याचा प्रयत्न करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल.     

माध्यमांच्या अहवालानुसार हे कार्य दहशतवादविरोधी विभाग करत आहे. सिंध पोलिस मध्ये या विभागाचे आयजी सनाउल्ला अब्बासी यांनी सांगितले की, एक डझनभर तुरुंगात कैद असलेल्या अतिरेक्यांची प्रोफाइल तयार करून त्यांना कट्टर वादाच्या मार्गातून हटविण्यासाठी प्रयत्न होतील. अब्बासी यांनी सांगितले की, तुरुंगात ३०० अतिरेकी बंद आहेत. सैन्यानेही खैबर पख्तुनख्वाच्या स्वात जिल्ह्यात अशी मोहीम सुरू केली.
बातम्या आणखी आहेत...