आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Pakistan's Ex Foreign Minister Khurshid M Kasuri

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई हल्ल्यानंतर भारताने लष्कर मुख्यालय उडवण्याची तयारी केली होती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी विदेशमंत्री खुर्शीद कसुरी यांनी वृत्तपत्राला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर भारत लाहोरनजीकच्या मुरिदकेमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या मुख्यालयावर हवाई हल्ला करण्याच्या तयारीत होता, असा दावा केला आहे.

या कारवाईला मूर्त स्वरुप देण्यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रालाही विश्वासात घेतले होते. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार राहिलेले जॉन मॅक्केन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पाकिस्तानात आले होते. लाहोरमध्ये जेवत असताना त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी भारताच्या कारवाईवर पाकिस्तानी लष्कराचे उत्तर काय असेल,अशी विचारणा केली. ते भारतातून आले होते त्यामुळे त्यांचे शब्द मी चकीत झालो. मी म्हणालो, भारताने हल्ला तर येथे जनक्षोभ उसळेल. कसूरी यांनी या गोष्टी पुस्तकात नमूद केल्या आहेत.
दिलीपकुमार नवाझ शरीफ यांना म्हणाले होते, तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती
कारगिल युद्धानंतर बॉलीवूड अभिनेते दिलीपकुमार यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना म्हटले होते की, मियांसाहेब, आम्हाला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. भारत-पाकिस्तानात शांतता असावी अशी तुम्ही अपेक्षा बाळगता. एक भारतीय मुसलमान म्हणून मी तुम्हाला सांगतो, भारत-पाकिस्तानमध्ये जेव्हा तणाव असतो तेव्हा भारतातील मुस्लिमांना असुरक्षित वाटते. त्यांना घराबाहेर पडण्यातही अडचणी येतात. पाकिस्तानचे तत्कालीन विदेशमंत्री खुर्शीद कसुरी यांनी आपले पुस्तक नीदर अ हॉक नॉर अ डव्हमध्ये हा दावा केला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी होत आहे.
कसुरी यांनी लिहिले की, पंतप्रधान शरीफ यांचे मुख्य सचिव सईद मेहंदी यांनी सांगितले की, मे १९९९ मध्ये कारगिल युद्धावेळी वाजपेयी यांचा फोन आला होता. वाजपेयींना खूप राग आला होता. ते शरीफ यांना म्हणाले, लाहोरमध्ये एवढे भव्य स्वागत केल्यानंतर कारगिल घडवून तुम्ही माझ्याशी खूप वाईट वागलात.

त्या वेळी शरीफ यांनी तुम्ही सांगत आहात त्याची मला माहिती नाही. लष्करप्रमुखांशी चर्चा करून तुम्हाला फोन करेन. शरीफ फोन ठेवण्यापूर्वीच वाजपेयी माझ्याजवळ एक मान्यवर व्यक्ती बसले आहेत. त्यांच्याशी तुम्ही बोला. त्यांचा आवाज ऐकून नवाज यांना धक्काच बसला. हा आवाज दुसऱ्या कोणाचा नव्हे तर दिलीपकुमार यांचा होता.