आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशिया-पाक यांच्यात मैत्री वाढण्याची चिन्हे, रशियाला पाकिस्तानात दिसू लागली बाजारपेठ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- अमेरिकेकडून मदतीत ‘कभी हां कभी ना’ हिंदोळ्यावर झुलणाऱ्या पाकिस्तानने आता रशियाशी सलगी वाढवण्यास सुरूवात केली. शीतयुद्धात रशिया आणि पाकिस्तान परस्परांचे विरोधक मानले जात. पाकिस्तान आणि रशियातील घनिष्ठ मैत्रीचे नवे पर्व सुरू होत असल्याचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गुरूवारी जाहीर केले.

रशियाकडून आर्थिक, व्यापार आणि विज्ञान क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी रशिया-पाकिस्तान आयोगाचे सदस्य सध्या पाकिस्तान भेटीवर आहेत. आयोगाचे नेतृत्व सहअध्यक्ष व्हिक्टर पी. इव्हानोव्ह यांच्याकडे आहे. शरीफ म्हणाले, पाकिस्तानची अर्थव्यवस्था वेगाने विकास करत आहे आणि परदेशी गुंतवणुकदारांच्या हे पसंतीचे ठिकाण होत चालले आहे.

विशेषत: ऊर्जेच्या क्षेत्रात गुंतवणूकदारांना अधिक संधी वाटतात. इव्हानोव्ह म्हणाले, पाकिस्तान समृद्ध इतिहास असलेला बळकट देश आहे. रशिया आणि पाकिस्तानमध्ये मजबूत व्यापाराच्या शक्यता आहेत. इस्लामाबाद आणि मॉस्को यांच्यात थेट विमान सेवा सुरू झाल्याने गुंतवणुकदारांना त्याचा फायदा होईल.

पुतीन यांना निमंत्रण
पंतप्रधान नवाज शरीफ यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले आहे. पुतीन यांनी नॉर्थ साऊथ गॅस पाइपलाइनचे उद््घाटन करावे, अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे, असे शरीफ म्हणाले. त्यामुळे पुतीन दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे.

संबंधात सुधारणा आणि भारताला विरोध
पाकिस्तान आणि रशियातील संबंधात सुधारणा होण्याची प्रक्रिया ऑगस्टपासून सुरू झाली. रशियाने पाकिस्तानला चार एमआय-३५ ‘हिंद ई’ हे लढाऊ हेलिकॉप्टर देण्याची ग्वाही दिली होती. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मात्र आपल्या रशिया दौऱ्यात पाकिस्तानला शस्त्र किंवा लष्करी साहित्य देण्यास विरोध केला होता.
संबंध खराब
रशिया पारंपरिकदृष्ट्या भारताचा मित्र आहे. भारत-पाकिस्तान युद्धातही रशियाने भारताची बाजू घेतली होती. पाकिस्तान आणि रशियात १९८० मध्ये संबंध ताणले होते. शीतयुद्धादरम्यान सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानात प्रवेश केल्यामुळे हे संबंध बिघडले हाेते.

संबंध खराब
रशिया पारंपरिकदृष्ट्या भारताचा मित्र आहे. भारत-पाकिस्तान युद्धातही रशियाने भारताची बाजू घेतली होती. पाकिस्तान आणि रशियात १९८० मध्ये संबंध ताणले होते. शीतयुद्धादरम्यान सोव्हिएत संघाने अफगाणिस्तानात प्रवेश केल्यामुळे हे संबंध बिघडले हाते.