आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DvM Special : सुटकेचे वृत्त येताच गुजराती मासेमाराचा आनंदातिरेकाने मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाक तुरुंगातून सुटलेला सुरिंदर आपले पारपत्र दाखवताना. - Divya Marathi
पाक तुरुंगातून सुटलेला सुरिंदर आपले पारपत्र दाखवताना.
अमृतसर - पाकिस्तानच्या तुरुंगात भारतीयत्वाची किती मोठी किंमत चुकवावी लागते, त्याचे एक नवे प्रकरण समोर आले आहे. अलीकडेच तेथील तुरुंगात डांबलेल्या करनाम खम्मन या भारतीय मासेमाराचा मृत्यू झाला. अनेक वर्षांपासून तुरुंगात डांबलेल्या ज्या भारतीय मासेमार कैद्यांची सुटका करण्यात येणार होती, त्यांच्या यादीत त्याचेही नाव होते, पण मृत्यूमुळे प्रशासनाने सुरिंदर या एका भारतीय कैद्याचे नाव यादीत टाकले. आता सुरिंदर भारतात आला आहे, पण तुरुंगात झालेल्या छळामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे.   
 
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारने आपल्या तुरुंगात डांबलेल्या गुजरातच्या ७८ मासेमारांना सोडून देण्याचे फर्मान काढले होते. या यादीत ३५ वर्षीय करनाम खम्मन यांचाही समावेश होता. त्याचा गावातील साथीदार रोखडने सांगितले की, खम्मन अनेक दिवसांपासून आजारी होता, पण तुरुंग प्रशासनाने त्याच्यावर उपचार केले नाहीत. पाच जुलैला खम्मनला जेव्हा आपल्या सुटकेची बातमी मिळाली तेव्हा त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा तत्काळ मृत्यू झाला. पाकिस्तानच्या सागरी सीमेत १४ महिन्यांपूर्वी पकडल्या गेलेल्या खम्मनला दोन मुली आणि एक मुलगा आहे. तो मासेमारी करून उपजीविका करत असे. दुसरीकडे, खम्मनच्या मृत्यूनंतर यादीत समाविष्ट केलेल्या २७ वर्षीय सुरिंदरचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. सुरिंदर बिहारच्या छपरा जिल्ह्यातील जलालपूर या गावचा रहिवासी आहे. 
 
मनोज माथूर आणि आई सुनीता यांच्या सहा अपत्यांपैकी सुरिंदर सर्वांत मोठा. सुरिंदरची स्मृती कमजोर असल्याने तो जास्त काही सांगू शकला नाही, पण त्याने थोडीफार माहिती दिली. त्यानुसार, १२ वर्षांपूर्वी तो काही मित्रांसह राजस्थानमध्ये फिरण्यासाठी गेला होता. तेथेच एक दिवस चुकीने सीमा ओलांडली आणि पकडला गेला. त्याच्यासोबत तुरुंगातून सुटलेल्या इतर मासेमारांनी सांगितले की, तुरुंगात चांगले जेवण न मिळाल्याने  आणि कुटुंबीयांशी  संपर्क न होऊ शकल्याने सुरिंदरची मानसिक स्थिती बिघडली.  
 
एकाच्या मृत्यूमुळे दुसऱ्याला जीवदान 
गुजरात मत्स्यपालन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खम्मनचा मृत्यू झाला नसता तर सुरिंदरची सुटका झाली नसती. पाकिस्तानने संख्या पूर्ण करण्यासाठी सुरिंदरला सोडले आहे. पण त्याची मानसिक स्थिती अशी आहे की, सध्या त्याला घरी पाठवता येत नाही. सुरिंदरची काहीच चूक नव्हती. पाकिस्तानने ठरवले असते तर त्याच वेळी त्याला परत पाठवू शकला असता. यातून पाकिस्तानची विकृत मनोवृत्ती दिसते. सुरिंदर सध्या अमृतसर जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आहे. 
बातम्या आणखी आहेत...