आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Information Of Dawood Kazi Khalilullah Cleared To Media

दाऊद कोठे दडलाय पाकला माहीत नाही, काझी खलीलुल्लाह यांचे माध्यमांकडे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कोठेही असेल तर भारत सरकार त्याला शोधून काढेल, असा निर्धार संसदेत करण्यात आला. मात्र, दाऊदला पाकने आश्रय दिलेला नाही, अशी भूमिका पाकिस्तानकडून व्यक्त करण्यात आली. दाऊद कोठे दडून बसलाय याची कोणतीही माहिती पाकिस्तानला नाही. भारताने ही वास्तविकता मान्य करावी व पाकवर आरोप करू नयेत, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे नवनियुक्त प्रवक्ते काझी खलीलुल्लाह यांनी माध्यमांसमोर सांगितले.

मंगळवारी संसदेत एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हरिभाई चौधरी यांनी लिखित उत्तरात दाऊदविषयी खुलासा केला होता. दाऊदचा शोध लागल्यास त्वरित प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे चौधरींनी म्हटले होते.

पाकिस्तानने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी-उर-रहेमान लख्वी याच्यावर संयुक्त राष्ट्रांच्या निर्देशाप्रमाणे कारवाई केली आहे. याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर होण्याची गरज लख्वीच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी, शस्त्र बाळगण्यावर बंदी, मालमत्ताही गोठवली गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फेडरली अॅडमिनिस्ट्रेटेड ट्रायबल एरियाज (फाटा) व बलुचिस्तानात भारतीय गुप्तहेर संस्थांचा निगराणी तर नेहमीच असते. मार्चमध्ये भारतीय परराष्ट्र सचिवांनी पाकला भेट दिली होती. त्या वेळी याविषयी बातचीत झाल्याची आठवण त्यांनी करून दिली.

भारताने विनाकारण हस्तक्षेप करू नये
पाकिस्तान भारताशी चर्चा करायला तयार असूनही भारत पाकिस्तानच्या भूभागात नाहक हस्तक्षेप करत असल्याचा आरोप खलीलुल्लाह यांनी केला. दहशतवादाशी मुकाबला करण्याच्या नावाखाली किंवा गुन्हेगार पाकमध्ये दडले असल्याचा आरोपाखाली भारत पाकिस्तानमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे मत त्यांनी पत्र परिषदेत व्यक्त केले.