आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतात मुळीच व्यवसाय नाही, शरीफ कुटुंबीयांचे स्पष्टीकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - भारतात आमचा कसलाही व्यवसाय नाही, असे स्पष्टीकरण पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कुटुंबाकडून देण्यात आले आहे. विरोधी पक्षनेते इम्रान खान यांच्या आरोपानंतर शरीफ यांच्याकडून ही भूमिका स्पष्ट करण्यात आली.

शरीफ यांच्या कोणत्याही नातेवाईकांची भारतात मालमत्ता नाही. इम्रान खान देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. २०१५ मध्ये इम्रान खान यांनी शरीफ यांच्या कुटुंबावर भारतात दोन चिनी कारखाने सुरू करून सुमारे ६ कोटी डॉलर कमाई केल्याचा ठपका होता. दुसरीकडे शरीफ कुटुंबाच्या व्यवसायात भारतीय लोक काम करतात, असा आरोप पाकिस्तानचे नेते तहीरूल कादरी यांनी केला होता.

‘काश्मीरमध्ये जनमत न घेणे हा यूएनचा पराभव’
संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानचे राजदूत मलिहा लोधी शुक्रवारी म्हणाले, काश्मिरी जनतेच्या भावना जाणून घेण्यात अपयश आल्यामुळे संयुक्त राष्ट्राचा पराभव झाला आहे. काश्मीरचा प्रश्न सुटत नाही. तोपर्यंत संयुक्त राष्ट्राला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करता येऊ शकत नाही. पाकिस्तानने सातत्याने सहा दशकांपासून हा मुद्दा मांडला आहे. काश्मिरींना स्वत:चे भवितव्य स्वत: ठरवण्याचा अधिकार मिळायला हवा. ही संयुक्त राष्ट्राची नैतिक जबाबदारी आहे.
बातम्या आणखी आहेत...