आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात दहशतवाद्यांनी हेलिकॉप्टर पाडले, नॉर्वे आणि फिलिपाईन्सचे राजदूत ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातानंतर हेलिकॉप्टरमध्ये आग लागली होती. - Divya Marathi
अपघातानंतर हेलिकॉप्टरमध्ये आग लागली होती.
लाहोर - पाकिस्तानमध्ये शुक्रवारी एका हेलिकॉप्टर अपघातात नॉर्वे आणि फिलीपाईन्सच्या राजदुतांचा मृत्यू झाला. माध्यमांतील वृत्तानुसार ही घटना गिलगिट-बाल्टिस्तान च्या नल्टर खोऱ्यातील आहे. घटनेनंतर तहरीक ए तालिबान पाकिस्तानने याची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानच्या लष्कराने मात्र यात दहशतवाद्यांचा हात नसल्याचे म्हटले आहे.
तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याचे कारण देण्यात आले आहे. हे एमअाय-17 हेलिकॉप्टर पाकिस्तान आर्मीचे होते. या अपघातानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी त्यांचा गिलगिट दौरा रद्द केला आहे. अपघातानंतर पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानात एक दिवसाचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे.

तालिबानने स्वीकारली जबाबदारी
किकडे पाकिस्तानच्या लष्कराने दहशतवादी हल्ला नसल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी तहरीक ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. टीटीपीचा प्रवक्ता मोहम्मद खोरासनी याने केलेल्या दाव्यानुसार त्याची टास्क फोर्स नवाज शरीफ यांच्या हेलिकॉप्टरवर लक्ष साधणार होते. पण चुकून त्यांनी दुसऱ्याच हेलिकॉप्टरवर हल्ला केला. खोरासानी म्हणाला की, टीटीपी हल्ला करण्यात आलेल्या शोल्डर लॉन्च मिसाइल (SAM SYSTEM) चा फोटो लवकरच सार्वजनिक करणार आहे.

दोन राजदुतांच्या पत्नींचाही मृत्यू
या हल्ल्यात नॉर्वचे राजदूत लिएफ लार्सन आणि फिलिपाइन्सचे राजदूत डोमिंगो डी लुसिनेरियो यांच्यासह मलेशिया आणि इंडोनेशिया यांच्या राजदुतांच्या पत्नींचाही मृत्यू झाला आहे. तर पोलंड आणि हॉलंडचे राजदूत जखमी झाले आहेत. यात एकूण सहा जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. त्यात दोन पायलटचाही समावेश आहे. मृत पायलटची ओळख मेजर अल्तमश आणि मेजर फैजल अशी झाली आहे. जखमींना गिलगिटच्या कम्बाइन्ड मिलिट्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तर मृतांचे पार्थिव इस्लामाबादेत पोहोचवण्यात आले आहेत.
दौऱ्यावर होते राजदूत
सर्व्हीस पब्लिक रिलेशनचे डीजीआय असीम बाजवा यांनी ट्विटद्वारे माहिती दिली की, पाकिस्तान आर्मीचे तीन एमआय-17 हेलिकॉप्टर अनेक परदेशी राजदूत आणि साहित्यासह गिलगिट-बाल्टिस्तानला गेले होते. हा राजदुतांचा दौरा होता. त्यात एकूण 37 देशांच्या नागरिकांचा समावेश होता. शाळेत लँडिंगदरम्यान हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि त्यात आग लागली. यानंतर नवाज शरीफही जाणार होते, पण त्यांनी नंतर दौरा रद्द केला.

पुढील स्लाइडवर पाहा, क्रॅश झालेल्या हेलिकॉप्टरचे PHOTO