आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nuclear Weapons Remove Possibility Of Indo Pak War

अंदमान-निकोबारवरही अण्वस्त्रांचा मारा करता येईल, अमेरिकी मंचावर पाकिस्तानचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानकडे अण्वस्त्रे असल्याने भारत आणि पाकिस्तान समोरासमोरचे युद्ध करु शकत नाहीत, असा दावा पाकिस्तानचे लेफ्टनंट जनरल (निवृत्त) खालिद किदवई यांनी कार्नेगी इंटरनॅशनल न्युक्लिअर पॉलिसी कॉन्फरन्समध्ये केला आहे. पाकिस्तानच्या स्ट्रेटेजिक प्लॅन डिव्हिजनचे गेल्या 15 वर्षांपासून किदवई प्रमुख राहिले असून सध्या नॅशनल कमांडचे अॅडव्हायझर आहेत. पाकिस्तानजवळ अण्वस्त्रे असल्याने भारतासोबत भविष्यात युद्ध होण्याचा धोका टळला आहे, असेही किदवई यांनी म्हटले आहे.
खालिद किदवई या कॉन्फरन्समध्ये पूर्णवेळ पाकिस्तानच्या अण्वस्त्र क्षमतांवर बोलत होते. भारताच्या कोणकोणत्या भागांवर अण्वस्त्राचा मारा करण्याची पाकिस्तानची क्षमता असल्याचे किदवई यांनी यावेळी सांगितले. पाकिस्तानच्या शाहिन-3 या क्षेपणास्त्राची रेंज 2750 किलोमीटर आहे. भारताच्या अंदमान-निकोबार बेटांवरही हल्ला करण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. या बेटांवर भारतीय लष्कराचे महत्त्वाचे तळ आहे. शाहिन-3 जमिनीवरुन जमिनीवर मारा करणारे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. 9 मार्च 2015 रोजी पाकिस्तानी लष्कराने याची पहिल्यांदा चाचणी घेतली होती.
अण्वस्त्रे शांतता प्रस्थापित करणारे शस्त्र
किदवई म्हणाले, की भारत आणि पाकिस्तान या देशांमधील युद्धाचे संभाव्य धोके लक्षात घेऊन पाकिस्तानने टॅक्टिकल न्युक्लिअर वेपन तयार केले आहेत. अण्वस्त्रे शांतता प्रस्थापित करणारे शस्त्र आहे. आम्हाला अण्वस्त्रांचा पूर्ण अभिमान आहे. संभाव्य युद्ध टाळण्यासाठी यांचा पुरेपुर वापर करता येतो.
भारताचीही पूर्ण तयारी
अण्वस्त्र हल्ल्यापासून वाचण्यासाठी भारतानेही पूर्ण तयारी केली आहे. वॉशिंग्टन आणि बीजिंग या शहरांप्रमाणेच नवी दिल्लीला सिक्युरिटी कव्हर देण्यात येणार आहे. याचे काम लवकर पूर्ण करण्याचा आदेश मोदी सरकारने दिला आहे. दिल्ली आणि एनसीआरमध्ये लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र ट्रॅक करण्यासाठी मिसाईल ट्रॅकिंग रडारची स्थापना करण्यात आली आहे. याचे काम पूर्ण झाल्यावर सुमारे 5 हजार किलोमीटर दूर अंतरावरुन येणाऱ्या क्षेपणास्त्राची माहिती मिळवता येईल.
इस्रायलच्या मदतीने हे स्वॉर्डफिश रडार तयार करण्यात आले आहे. सध्या 800 किलोमीटर दूरवरुन येणाऱ्या मिसाईलची माहिती यात मिळवता येते. रडारची स्थापना झाल्यानंतर 2016 पर्यंत मिसाइल इंटरसेप्ट युनिटची स्थापना करण्यात येणार आहे. त्यानंतर दिल्लीचा समावेश अशा शहरांमध्ये केला जाईल जेथे मिसाईल हल्ला करता येणार नाही. सध्या वॉशिंग्टन, बीजिंग, पॅरिस, लंडन आणि तेल अविव या शहरांमध्ये ही सुविधा आहे. दिल्लीनंतर मुंबईतही अशी व्यवस्था केली जाणार आहे.
पुढील स्लाईडवर वाचा, कोणत्या देशाकडे किती आहेत अण्वस्त्रे...