आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑइल टँकर आगीतील मृतांची संख्या पोहोचली 175 वर, बहुतेकांची प्रकृती गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- पाकिस्तानातील ऑइल टँकर आगीच्या घटनेतील मृतांची संख्या १७५ वर पोहोचली आहे. काही रुग्णांवर लाहोर, मुलतान, फैसलाबादमधील रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी बहुतेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले.  
 
विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या रुग्णांची संख्या ६० आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढू शकते, अशी भीती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. उपचार घेत असलेले रुग्ण वाचले तर ती ईश्वरी कृपा होईल. बहुतेक रुग्ण ६० ते १०० टक्के जळाले होते. लाहोरमध्ये तर अशा स्थितीतील रुग्णांवर उपचार करण्यासाठी योग्य कक्षाचा अभाव आहे, असे जिना रुग्णालयाच्या डॉक्टरांनी मान्य केले.  घटनेनंतर १२० जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. त्यात महिला-मुलांचा समावेश  होता. गेल्या आठवड्यातील या घटनेत १४० वर लोक जखमी झाले होते. ईदच्या तोंडावरच ही घटना घडली होती.  

टायर फुटल्याने आग
लाहोरपासून ४०० किलोमीटरवर बहावलपूर येथे टायर फुटल्याने टँकरला आग लागली होती. त्यानंतर टँकरमधील तेलाची मोठ्या प्रमाणात गळती झाली. हे तेल गोळा करण्यासाठी परिसरातील अनेक लोकांनी जीव धोक्यात घातला. त्यातच तेही होरपळून निघाले. त्यामुळे मृतांची संख्या वाढली आहे. व्हिडिआे फुटेजमध्ये लोक पेटत्या टँकरजवळ तेलाची चोरी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात.  घटनेतील टँकर चालकाचा मृत्यू बुधवारी झाला. तो ९० टक्के भाजला होता.  
बातम्या आणखी आहेत...