आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफ यांच्या याचिकेवर, 12 सप्टेंबरला सुनावणी; पनामा पेपर्स लीक प्रकरण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानातील सर्वोच्च न्यायालयात १२ सप्टेंबर रोजी पनामा पेपर्स लीक प्रकरणातील अपात्रतेला आव्हान देणारे नवाझ शरीफ यांच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. शरीफ त्यांच्या मुलांनी फेरआढावा घेण्याची विनंती याचिकेतून केली आहे. 
 
सर्वोच्च न्यायालयाने २८ जुलै रोजी ६७ वर्षीय शरीफ यांना पंतप्रधानपदावरून अपात्र ठरवले. पनामा प्रकरणात बेकायदा व्यवहार, भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर ठपका आहे. पुढील आठवड्यात एजाज अफझल यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय पीठासमोर या फेरआढावा याचिकेची सुनावणी होणार आहे. शरीफ यांना अपात्र ठरवणारेदेखील हेच पीठ होते. शरीफ यांच्या मुलांनीही याचिका दाखल केली आहे. त्यात अर्थमंत्री इशक दर यांनी २८ जुलैच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. वास्तविक पूर्वी झालेल्या सुनावणीत कोर्टाने शरीफ यांच्या दाव्याला फेटाळून लावले होते. शरीफ यांच्यावर आरोप करणाऱ्यांमध्ये  तेहरिक -ए-इन्साफचे इमरान खान यांच्यासह देशातील अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश होता.  
बातम्या आणखी आहेत...