आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकच्या कणखर महिलेवरील चित्रपट ऑस्करला; जमिन वाचवण्यासाठी हाती घेतले होते शस्त्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानातील सर्वात कणखर महिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाजो धरिजो ऊर्फ मुख्तयार नाज यांच्यावर आधारित चित्रपट पुढील वर्षी ऑस्करला जाणार आहे. नाजो धरिजो पाकिस्तानातील सिंध प्रांताच्या दुर्गम काजी अहमद गावात राहतात. २००५ मध्ये ऑगस्टच्या एका रात्री त्यांची वडिलोपार्जित जमीन घेण्यासाठी शत्रूने २०० बंदूकधाऱ्यांसह त्यांच्या घरावर चाल करत गोळीबार केला होता. तेव्हा नाजो यांनी आपल्या बहिणींसह एके-४७ रायफल काढली होती. छताच्या मार्गे मागे जाऊन त्यांनी  शत्रूला गोळीबाराने प्रत्युत्तर दिले होते. हे पाहून शत्रूंनी त्यांच्यापुढे गुडघे टेकले होते. त्यांच्या या धाडसावर हॉलीवूडमध्ये चित्रपट बनला. त्याला ऑस्करसाठी नामांकन मिळाले आहे. पुढील वर्षी ९२ देशांत हा चित्रपट पोहोचेल. त्यात कंबोडियामधील नरसंहारावर आधारित चित्रपटही आहे. त्यात अँजेलिना जोलीची मुख्य भूमिका आहे.

 

जमीन बळकावण्यासाठी आलेले शत्रू चाेहोबाजूंनी करत होते गोळीबार

नाजो यांचे वडील हाजी खुदा बक्ष यांच्या वडिलांनी चार विवाह केले होते. त्यामुळे मालमत्तेच्या वाटपावरून भाऊबंदकी सुरू होती. वडिलांच्या मृत्यूनंतर खुदा बक्ष यांनी आपल्या वाट्याच्या जमिनीवर ताबा घेतला. ही गोष्ट इतर भावांना आवडली नाही. दररोज भांडण होत. वादात गोळीबारही झाला. खुदा बक्ष यांच्या तीन मुलींमध्ये नाजा थोरली. सिंध प्रांतातील एक भाग पितृसत्तेसाठी आेळखला जातो. मात्र खुदा बक्ष यांनी तीनही मुलींना मुलांसारखेच वाढवले होते.

 

त्यांना विद्यापीठात पदवीपर्यंत शिकवले. मुलींना एके-४७ बंदूक चालवायला शिकवली. तिकडे शत्रू बनलेल्या भावांनी खुदा बक्ष यांना मारण्यासाठी राजकारणाची मदत घेतली. नाजोचे भाऊ सिकंदर यांना पोलिसांनी बनावट चकमकीत ठार केले. खोटा आरोप करून खुदा बक्ष यांना तुरुंगात डांबले. भावाचा मृत्यू, वडील तुरुंगात असल्याचा फायदा घेत ऑगस्ट २००६ मध्ये एका रात्री शत्रूंनी २०० सशस्त्र लोकांसह हल्लाबोल केला. आपल्या वडिलोपार्जित जमिनीला वाचवण्यासाठी नाजो, बहिणींसह एके-४७ घेऊन घरातून बाहेर पडली. त्या छतावरून घराच्या मागे गेल्या. त्यानंतर त्यांनी शत्रूवर गोळीबार केला. गोळ्या कमी असतानाही त्या धीराने उभ्या होत्या. या प्रत्युत्तरामुळे शत्रू बुचकळ्यात पडले. ते गोळीबार करत राहिले. परंतु त्यांना घरात घुसता आले नाही. अखेर ते पळून गेले. दुसऱ्या दिवशी नाजो यांच्या धैर्याची पंचक्रोशीत चर्चा सुरू झाली होती. त्या स्वाभिमानाने जीवन जगत आहेत. 

 

कायद्याची लढाई जिंकली, शत्रूंनीही माफी मागितली
गोळीबाराच्या घटनेच्या पाच वर्षांनंतर नाजो धरिजो कायद्याच्या लढाईत विजयी झाल्या. आता त्या जमिनीची मालक बनल्या आहेत. त्या शेती कसतात. त्यांना पंचक्रोशीत मानमरातब आहे. शत्रूंनी गोळीबाराच्या त्या घटनेबद्दल जाहीरपणे क्षमा याचना देखील केली होती. न्यायालयाच्या निर्णयानुसार नाजो यांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई देखील मिळाली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...