आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'कंदहार\'च नव्‍हे त्‍यापूर्वीही झाले होते भारताच्‍या सात विमानांचे अपहरण, जाणून घ्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहौर विमानतळावर पेटवून दिलेले विमान आणि इन्‍सेटमध्‍ये अपहरणकर्ते. - Divya Marathi
लाहौर विमानतळावर पेटवून दिलेले विमान आणि इन्‍सेटमध्‍ये अपहरणकर्ते.
इंटरनॅशनल डेस्क- वर्ष 1999 मध्‍ये पाक पुरस्कृत इस्लामिक दहशतवाद्यांनी काठमांडू येथून भारतीय विमानाचे (814 ) अपहरण करून ते कंदहारला (अफगाणिस्तान) नेले होते. त्‍या बदल्‍यात भारताला तीन क्रुर दहशतवाद्यांना सोडावे लागले. यामध्‍ये जैश-ए-मोहंमद संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचाही समावेश होता. मात्र, अपहरण झालेले '814' हे भारताचे काही पहिलेच विमान होते असे नाही तर यापूर्वीही तब्‍बल सात वेळा असा प्रकार घडला होता. 30 जानेवारी 1971 रोजी 16 वर्षांच्‍या पोरांनी नकली पिस्‍तुलाच्‍या धाकावर केले होते पहिल्यांदा विमानाचे अहपरण....
 
- 30 जानेवारी 1971. इंडियन एअरलाइन्‍सच्‍या गंगा (व्‍हीटी-डीएमएम) या विमानाने श्रीनगरवरून जम्‍मूकडे उड्डाण केली. त्‍यात एकूण 27 प्रवासी होते. 
- विमानाने हवेत झेप घेताच 16 वर्षांच्‍या हाशीम कुरैशी या मुलाने कॉकपिटला लाथ मारली आणि काही कळायच्‍या आत वैमानिकाच्‍या डोक्‍यावर बंदूक ठेवली. 
- ही बंदूक नकली होती पण वैमानिकाला ते माहित नव्हते त्यामुळे तो घाबरला. 
- दरम्‍यान, त्‍याचा दुसरा साथिदार अशरफ कुरैशी हा कॉकपिट दारावर लक्ष ठेवून होता. आपण विमान अपहरण केल्‍याची घोषणा त्‍याने केली.
 
पाकिस्‍तानात नेले विमान-
 
- हाशीम आणि अशरफ कुरैशी यांनी या बनावट बंदुकीचा धाक दाखवून हे विमान लाहौर विमानतळावर उतरावायला लावले.
- त्‍या ठिकाणी सुरुवातीला महिला आणि मुलांना सुखरुप विमानतळाच्‍या इमारतीत पाठवले गेले.
- एका दिवसानंतर इतर पुरुष प्रवाशांची हॉटेलमध्‍ये रवानगी करण्‍यात आली.
 
कुणी आणि कशासाठी केले होते अपहरण-
 
- जम्मू अॅण्‍ड कश्मीर नॅशनल लिबरेशन फ्रंट (जेकेएनएलएफ) च्‍या दोन तरुण दहशतवाद्यांनी हे अपहरण केले होते.
- भारताने आपल्‍या 35 साथिदारांची सुटका करावी, ही त्‍यांनी मागणी होती.
 
विमानाला लावली आग-
 
भारताने वाटाघाटी करून बसने या प्रवाशांना भारतात आणले. त्‍यापूर्वी 2 फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी हे विमान पेटवून दिले.
 
पुढे स्लाईडद्वारे वाचा, शीख दहशतवाद्यांनी केले होते दुसरे विमान अपहरण...
बातम्या आणखी आहेत...