आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाफिज सईदला पाकने ठरवले अतिरेकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात उद दावा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफिज सईदचा समावेश दहशतवादविरोधी कायद्याच्या यादीत करून सईदचा दहशतवादाशी संबंध असल्याला पाकिस्तानने मौन स्वीकृती दिली.  

‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाब प्रांताच्या सरकारने हाफिज सईद व त्याचा विश्वासू सहकारी काझी काशीफला दहशतवादविरोधी कायद्याच्या (एटीए) चौथ्या अनुसूचित टाकले आहे. या अनुसूचित अब्दुल्ला ओबैद, जफर इक्बाल आणि अब्दुर रहमान आबिद या तिघांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...