आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानच्या वल्गना : आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला तर भारत तो विसरणारच नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. त्या देशाचे पंतप्रधान, लष्करप्रमुख आणि हवाई दल प्रमुखांनी गुरुवारी चिथावणी देणारी भाषणे केली. लष्करप्रमुख राहील शरीफ म्हणाले की, ‘जर आम्ही सर्जिकल स्ट्राइक केला तर भारताच्या आगामी पिढ्याही तो विसरू शकणार नाहीत. पाकिस्तानने जो केला तो सर्जिकल स्ट्राइक असतो असे भारत आपल्या मुलांना अभ्यासक्रमात शिकवेल.’ खैबर पख्तूनख्वां प्रांतात शाहिद आफ्रिदीच्या नावे तयार केलेल्या स्टेडियमच्या उद्घाटनानंतर राहिल शरीफ बोलत होते. राहिल शरीफ २९ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत.

नागरिकांना जाणूनबुजून लक्ष्य करू नका : भारतीय लष्कर आमच्या नागरी वस्त्यांना जाणूनबुजून लक्ष्य करत असल्यास पाकिस्तान ते खपवून घेणार नाही, असा इशारा पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी गुरुवारी नागरी नेते आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला. ते म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर हा पाकिस्तानसाठी ‘कधीही न संपणारा कार्यक्रम’ आहे. हा मुद्दा लावून धरणे आम्ही भविष्यात कधीही सोडणार नाही.

पुढे वाचा, पाकिस्तान भारताला घाबरत नाही : हवाई दल प्रमुख...
बातम्या आणखी आहेत...