आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्ग्यावरील हल्ल्यानंतर पाकच्या कारवाईत 42 अतिरेक्यांचा खात्मा, देशव्यापी कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या दर्ग्यावरील आत्मघातकी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी सुरक्षा दलाने देशभरात केलेल्या कारवाईत ४२ दहशतवाद्यांचा खात्मा झाला.  लाल शाहबाज कलंदर दर्ग्याला गुरुवारी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते.
 
पाकिस्तानातील रक्तपाताच्या सर्वात मोठ्या घटनांमध्ये या घटनेचा समावेश होतो. सिंध प्रांतात गुरुवारी रात्री देखील सुरक्षा दलाने मोठी कारवाई केली होती. त्यात १९ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. हा दर्गा तेराव्या शतकातील आहे. कराचीतील एका धुमश्चक्रीत ११ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. वायव्येकडील खैबर-पख्तुनख्वा भागात झालेल्या चकमकीत १२ कट्टरवाद्यांना ठार करण्यात आले. आेराक्झी या आदिवासी भागात ४ जणांना ठार करण्यात आले. बन्नू भागातही सुरक्षा दलाने मोठे छापे सत्र राबवले.
 
खुर्रम, मोहंमद या आदिवासी भागातील कारवाईत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. अफगाणिस्तानच्या सीमेवर ही कारवाई करण्यात आली होती. बलुचिस्तानमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील कारवाईत दोन अतिरेक्यांना ठार करण्यात आले. 
 
सुरक्षेला धोक्याची आता दिली कबुली  
गेल्या आठवड्यातील अनेक दहशतवादी हल्ले व दर्ग्यावरील आत्मघाती हल्ल्यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका आहे, हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मान्य केले. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शरीफ यांनी ही कबुली दिली आहे. दहशतवाद पोसणे खूप घातक ठरू शकते, असे भारताने पाकिस्तानला वारंवार बजावले होते, परंतु आता देशातील हिंसाचार आणखीनच वाढला आहे.  
 
इसिसला आता हवे पाकवर वर्चस्व 
सिरियातील संघर्ष आता जवळपास संपुष्टात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानवर वर्चस्व मिळवण्याचे इसिसचे मनसुबे आहेत, असे पाकिस्तानचे अमेरिकेतील राजदूत एजाज चौधरी यांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानमार्गे दहशतवादाने पाकिस्तानात शिरकाव केला आहे. हेच विघातक तत्त्व आता देशातील सामाजिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. पाकिस्तान सुपर लीग क्रिकेट सामन्यांना उधळवून टाकण्याचे दहशतवाद्यांचे प्रयत्न आहेत.
 
आणखी तीव्र करणार  
दर्ग्याला लक्ष्य करण्यात आल्याने खवळलेल्या पाकिस्तान सरकारने आगामी काही दिवस दहशतवाद्यांच्या विरोधातील माेहीम आणखी तीव्र करण्याचे ठरवले आहे. गेल्या आठवड्यात देशात आठ दहशतवादी हल्ले झाले होते. त्यात डझनावर निष्पाप लोक ठार झाले होते.  ताज्या घटनेने मोहीम तीव्र करण्यात आली आहे.   
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...