आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ला काश्मीरला पाठवण्याचा प्रयत्न, पाकची आंतरराष्ट्रीय संघटनेला गळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये हस्तक्षेप करण्याची नवी चाल खेळण्यास सुरुवात केली आहे. आमच्या देशाच्या डॉक्टरांच्या चमूला जम्मू-काश्मीरमध्ये येण्याची परवानगी देण्यात यावी. जेणेकरून पॅलेट गनने जखमींवर उपचार करता येऊ शकतील, अशी विनंती पाकिस्तानने केली होती, परंतु भारताने त्यास नकार दिला होता. आता पाकने आंतरराष्ट्रीय संघटना डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्सला काश्मीरमध्ये वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

भारतीय सेनेच्या आक्रमकतेमुळे काश्मीरमध्ये हजारो लोक जखमी झाले आहे. त्यांना वैद्यकीय मदत मिळत नाही. त्यासाठी आम्ही डॉक्टर्स विदाऊट बॉर्डर्सला त्यासाठी पत्र पाठवून विनंती केली आहे, असे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अजीज यांनी म्हटले आहे. भारताच्या ताब्यातील काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या अत्याचारात मोठ्या संख्येने लोक गंभीर जखमी झाले आहेत. शेकडोंना डोळ्याला दुखापत झाली आहे. तुम्ही त्यांना तत्काळ उपचार पुरवावेत, असे आम्ही पत्रातून कळवले आहे.

‘दहशतवादी शहीद’
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी ठार झाल्यानंतर प्रदेशात हिंसाचार उसळला होता. त्यात ५० जणांचा मृत्यू झाला. नवाझ शरीफ यांनी वानीला शहीद असे संबोधले. त्याच्या निषेधार्थ ब्लॅक डे साजरा करण्यात आला. सार्क परिषदेत राजनाथ सिंह यांच्या भाषणालाही ब्लॅक आऊट केले होते.
बातम्या आणखी आहेत...