आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak Blast At Punjab Home Minister Shuja Khanzadas Office

पाकिस्तानात आत्मघाती हल्ला, गृहमंत्र्यांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात रविवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात राज्याचे गृहमंत्री कर्नल शुजा खानजादा आणि डीएसपी सईद शौकत शाहयांच्यासह १२ ठार तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले. लष्कर-ए-झंगवी या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. आत्मघाती हल्लेखोराने खानजादा यांच्या शादी खान गावात त्यांच्या घरी धार्मिक कार्यक्रम सुरु असताना बॉम्बस्फोट करून स्वत:ला उडवले. घराचे छत कोसळून खानजादा यांच्यासह ३० पेक्षा जास्त लोक ढिगाऱ्याखाली दबले. खानजादा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.