आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकचा दावा- फायरिंगमध्ये भारताचे जास्त नुकसान, पाकचे 20 तर भारताचे 40 जवान शहिद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानच्या एका टॉप मिल्ट्री कमांडरने देवा केला आहे, की भारताला शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची मोठी किंमत मोजावी लागत आहे. एलओसीवर चालू असलेल्या फायरिंगमध्ये पाकिस्तानच्या तुलनेत भारताचे दुप्पट नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या 10 कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल मलिक जफर इकबाल यांनी दावा केला आहे की, पाकचे केवळ 20 तर भारताचे 40 पेक्षा जास्त सैनिक शहिद झाले आहेत.

पाकिस्तानने आणखी काय केला दावा
- न्यूज एजन्सीनुसार, जनरल इकबाल यांचे हे वक्तव्य पाक आर्मी चीफ जनरल राहील शरीफच्या त्या दाव्यानंतर समोर आले आहे, ज्यामध्ये राहील यांनी सांगितले होते की काही दिवसांपूर्वी झालेल्या फायरिंगमध्ये इंडियन आर्मीचे कमीत कमी 40 सैनिक शहिद झाले आहेत.
- पुढे त्यांनी असाही दावा केला की, इंडीयन आर्मी जनतेच्या रागामुळे झालेले नुकसान लपवण्याचा प्रयत्न करत आहे.
- इकबाल यांनी आणखी दावा केला आहे की, इंडियन आर्मीच्या शाहिद झालेल्या जवानांची संख्या वाढत चालली आहे, जे भारताला सहन होत नाही.
- भारतीय लष्कराने दुपारी फायरिंग सुरु केली तर त्यांना संध्याकाळ होण्यापूर्वी त्याचे उत्तर दिले जाते आणि जर रात्री फायरिंग केली तर आम्ही सकाळ होण्यापूर्वीच त्याचे उत्तर देतो.

पुढे वाचा, पाकिस्तानी नौदलाचा दावा भारताने फेटाळला...
बातम्या आणखी आहेत...