आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लख्वीच्या आवाजाचे नमुने देण्यास पाक काेर्टाचा नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- २६/११च्या मुंबई हल्ला खटल्याला नवे वळण मिळाले आहे. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी मुख्य सूत्रधार झकी उर रेहमान लख्वीच्या आवाजाचे नमुने सादर करण्याविषयीची पाकिस्तान सरकारची याचिका फेटाळली. त्यामुळे भारताला या आवाजांचे नमुने मिळण्याच्या शक्यता मावळल्या आहेत. वर्ष २०११ ते २०१५ दरम्यानचे लख्वीच्या आवाजाचे नमुने सादर करण्याची मागणी सरकारने केली होती. कायद्याच्या चौकटीत असे नसल्याची भूमिका न्यायालयाने घेतली आहे.
भारतीय गुप्तहेर विभागाने वर्ष २००८ मध्ये झालेल्या हल्ल्यासंदर्भात हल्ल्याचे कर्ते-करविते दहशतवाद्यांदरम्यानचा संवाद रेकॉर्ड केला होता. याचे रेकॉर्ड उपलब्धही आहेत. यांच्याशी आवाजाचे नवे नमुने पडताळले जाणार होते. दहशतवाद्यांना यासंबंधी सूचना दिल्या जात होत्या. हा खटला उच्चस्तरीय असून हे संवादाचे रेकॉर्ड तपास कार्याला अधिक परिपूर्ण करेल, असा युक्तिवाद फिर्यादी पक्षाने केला आहे. सुषमा स्वराज यांच्या पाक दौऱ्यादरम्यान कारवाईचे अाश्वासन देण्यात अाले हाेते.