आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीटीआय नेते इमरान खान यांच्या अटकेचे आदेश, निवडणूक आयोगाने काढला वॉरंट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे प्रमुख विरोधी पक्ष नेते इमरान खान यांच्या अटकेचे आदेश बजावण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने निवडणूक आयोगाच्या अवमान प्रकरणी पोलिसांना यासंदर्भात पत्र पाठवून आदेश दिले. त्यानुसार, खान यांना अटक करून 25 सप्टेंबरपूर्वी त्यांना निवडणूक आयोग पाकिस्तानकडे हजर करावे लागणार आहे. 
 
 
काय आहे प्रकरण?
- पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पीटीआय (पाकिस्तान तहरीक ए-इन्साफ) चे नेते इमरान खान यांना 14 सप्टेंबर रोजी समन्स बजावले होते. 
- 1976 च्या लोकप्रतिनिधी कायद्या अंतर्गत त्यांच्या विरुद्ध निवडणूक आयोगाच्या अवमाननेचे आरोप लावण्यात आले आहेत. मात्र, त्यांनी हजर होण्यास नकार दिला. 
- यानंतर इलेक्शन कमिशन पाकिस्तानने (ईसीपी) पोलिस विभागाला पत्र पाठवून इमरान यांच्या अटकेचे आदेश बजावले आहेत. हा अटक वॉरंट जामीनपात्र आहे.
- अटक वॉरंट जामीनपात्र असला तरीही, त्यांना या जामीनासाठी 1 लाख रुपये (पाकिस्तानी) आणि दोन जामीनदार आवश्यक राहणार आहेत. 
 
बातम्या आणखी आहेत...