आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षीय मुलीची तासभर विवस्त्र धिंड, भावाच्या प्रेम प्रकरणाची बहिणीला शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवस्त्र धिंड काढली, त्यावेळी इतर गावकऱ्यांनी बघ्यांची भूमिका घेतली. - Divya Marathi
विवस्त्र धिंड काढली, त्यावेळी इतर गावकऱ्यांनी बघ्यांची भूमिका घेतली.
इंटरनॅशनल डेस्क - पाकिस्तानातील एका गावात स्थानिकांनी अमानुषपणाचा कळस गाठला. त्यांनी एका अवघ्या 14 वर्षीय मुलीचे कपडे काढून तिला तासभर गावात फिरवले. तिची विवस्त्र धिंड काढण्याचे कारण एवढेच होते, की तिच्या भावाचे एका मुलीशी प्रेम संबंध असल्याचे गावकऱ्यांना कळाले होते. पाकिस्तानातील या गावकऱ्यांनी याची शिक्षा त्याच्या बहिणीला दिली. 
 
> पाकिस्तानातील कुप्रसिद्ध आदिवासी प्रांत खैबर पख्तुनख्वा येथे हा प्रकार घडला आहे. यात 14 वर्षीय मुलगी पाणी भरण्यासाठी गेली होती. त्याचवेळी तिला स्थानिकांनी घेरले. 
> यानंतर त्या टोळक्याने संबंधित अल्पवयीन मुलीवर दमदाटी करून तिला सगळेच कपडे काढायला लावले. हा प्रकार समस्त गावकरी गर्दी करून पाहत होते. पण एकही समोर येऊन त्यांना थांबवायला तयार नव्हता. 
> यानंतर त्यांनी मुलीची संपूर्ण विवस्त्र अवस्थेत तासभर गावात धिंड काढली. तिच्या मागे आणि सभोवताल अख्खा गाव मुक्याची भूमिका घेऊन पुढे जात होता. यानंतर गावकऱ्यांनी आपण घाबरलो होतो असे स्पष्टीकरण दिले. 
 
काय आहे प्रकरण?
> या मुलीला शिक्षा देणारे दुसरे तिसरे कुणी नसून गावातलेच लोक होते. पीडितेचा भाऊ सज्जाद याचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेम संबंध असल्याचे गावकऱ्यांना कळाले होते. 
> सज्जादचे ज्या मुलीशी प्रेम प्रकरण होते त्यांनी पंचायत भरवली आणि सज्जादवर आपल्या कुटुंबाला बदनाम केल्याचे आरोप लावले. यावर पंचायतीने आपला फरमान काढला आणि सज्जादच्या कुटुंबियांवर 1 लाख 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला. 
> दंड लवकरात लवकर भरल्यास दुसरी कुठलीही कारवाई केली जाणार नाही अशी तंबी सज्जादच्या कुटुंबियांना देण्यात आली. मात्र, सज्जा गरीब कुटुंबातून असल्याने त्यांनी दंडाची रक्कम देण्यास नकार दिला. 
> यानंतर पुन्हा एकदा पंचायत भरवण्यात आली आणि सज्जाद तुमच्या कुटुंबातील मुलीशी प्रेम संबंध ठेवत असेल तर तुम्हीही सज्जादच्या कुटुंबियांवर तसेच करू शकता अशी खुली सूट दिली असे वृत्त आहे.
> एका स्थानिकाने सांगितल्याप्रमाणे, पंचायतीच्या निकालानंतर 27 ऑक्टोबर रोजी सज्जादची बहिण घराजवळच पाणी भरण्यासाठी गेली होती. काहींनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी संबंधित अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार देखील केला. मात्र, पोलिसांनी अद्याप त्यास अधिकृत दुजोरा दिला नाही. 
> दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी 8 जणांना अटक केली. मात्र, या कृत्याचा सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती आलेला नाही.
 
बातम्या आणखी आहेत...