आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak Government Claims RAW Plans To Kill PM Nawaz And Hafiz Saeed

RAW रचत आहे शरीफ, हाफिज सईद यांच्‍या हत्‍येचा कट - पाक मीडियाचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- पाकिस्तानचे वर्तमानपत्र 'द डॉन'ने दावा केला की, भारतीय इंटेलिजन्स एजन्सी, RAW (Research it and Analysis Wing) पंतप्रधान नवाज शरीफ यांच्‍या हत्‍येचा कट रचत आहे. तेथील पंजाब राज्‍यातील सरकारने नवाज शरीफ आणि जमात-उद-दावा चीफ हाफिज सईद यांना रॉ पासून धोका असल्‍याचे सांगितले आहे. हाफिज सईद मुंबईवर झालेल्‍या 26/11 च्‍या दहशतवादी हल्‍ल्याचा मास्टरमाइंड आहे.
काय लिहीले 'द डॉन'ने?
पाकिस्‍तानमधील पंजाब राज्‍यातील गृह विभागाच्‍या एका अधिका-याने दिलेल्‍या माहितीवर 'द डॉन' ने लिहीले की, दोन दिवसांपूर्वी यासदर्भात गुप्‍त माहिती मिळाली आहे. रॉ नवाज शरीफ आणि हाफिज सईद यांच्‍या हत्येचा कट रचण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. संबंधित अधिका-यांने अशीही माहिती दिली की, रॉने आपल्‍या एजंटकडे नवाज आणि हाफिज यांच्‍या हत्‍येचे काम सोपवले आहे.
- पाकिस्‍तानी वृत्‍तपत्राच्‍या माहितीनुसार, पंजाब होम डिपार्टमेंटकडून जाहीर केलेल्‍या पत्रामध्‍ये रॉच्‍या 'हाय व्‍हॅल्‍यू टारगेट्स' चा उल्‍लेख करण्‍यात आला आहे. रॉला पाकिस्‍तानमध्‍ये मोठ्या प्रमाणात अराजकता निर्माण करायची आहे, असा इशाराही या पत्रात देण्‍यात आला आहे.

- या पत्रानुसार, पंतप्रधान कार्यालयाच्‍या (पीएमओ) स्टाफला आदेश देण्‍यात आले की, त्‍यांनी शरीफ यांची सुरक्षा वाढवावी. विशेष म्‍हणजे ते सार्वजनिक ठिकाणी असतात तेव्‍हा विशेष खबरदारी घ्यावी.

- या पत्रामध्‍ये असेही लिहीले आहे की, रॉने पंजाबमध्‍ये त्‍यांच्‍या एजंटला हाफिजच्‍या ठिकाणांची माहिती घेण्‍याचे आदेश दिले आहेत.