आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak Isnt Myanmar We Are A Nuclear Nation Minister From Neighbouring Country Tell

अणुबॉम्ब \'शब-ए-बारात\'साठी ठेवलाय का? मुशर्रफ यांची लष्कराला चिथावणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - म्यानमारमधील कारवाईनंतर संपूर्ण पाकिस्तानात खळबळ माजली आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनी या मुद्यावरून पाकिस्तानच्या लष्कराला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे. आपण अणुबॉम्ब काय शब-ए-बारात साठी राखून ठेवला आहे का? असा सवाल मुशर्रफ यांनी लष्कराला केला आहे.
वेळप्रसंगी म्यानमारप्रमाणेच शेजारी देशांच्या सीमेतही प्रवेश करून ऑपरेशन करू या इशाऱ्यावर पाकिस्तानने पलटवार केला आहे. आम्ही म्यानमार नसून अण्वस्त्रधारी देश आहोत, त्यामुळे सीमोल्लंघन केल्यास त्याचे उत्तर दिले जाईल, असे पाकिस्ताने म्हटले आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित मंत्री राणा तनवीर हुसेन यांनी भारताला इशारा देत असे म्हटले आहे की, ''आम्ही म्यानमार नाही, तुम्हाला आमच्या शक्तीचा अंदाज नाही का? पाकिस्तान एक न्युक्लिअर नेशन आहे. आमच्याकडे न्युक्लिअर बॉम्ब आहे. म्यानमारप्रमाणे शेजारी देशांत दहशतवाद्यांविरोधी कारवाईसाठी भारत सीमेपलिकडेही जाऊ शकतो, असे संकेत भारताने बुधवारी दिले होते.
तीन वर्षांपूर्वी पाकिस्तानकडे होते भारतापेक्षा अधिक 10 अणुबॉम्ब
बुलेटिन ऑफ द अॅटोमिक साइंटिस्टने मार्चमध्ये एका रिपोर्टमध्ये कोणत्या देशाकडे किती अणुबॉम्ब आहेत ते नमूद केले होते. त्यानुसार पाकिस्तानकडे 110 अणुबॉम्ब होते. तर भारताकडे 100 अणुबॉम्ब होते. पण हे आकडे 2012 च्या स्थितीनुसार होते. त्यानंतर स्थिती किती बदलली आणि नवीन आकडे किती हे अद्याप समोर आलेले नाही.
देश
अणुबॉम्ब
भारत
90-100
पाकिस्तान
100-110
चीन
250
अमेरिका
7300
रशिया
8000
आपल्या लष्करासमोर पाकचा टिकाव लागणे अवघड
भारत
पाकिस्तान
प्रत्यक्ष लष्कर
13.25 लाख
6.17 लाख
विमाने
1905
914
लढाऊ विमाने
761
387
हेलिकॉप्टर
584
313
सर्व प्रकारच्या टँक
6464
2924
युद्धनौका
202
74
विमानवाहू नौका
2
0
पाणबुड्या
15
8
सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्र
अग्नि-5, 5000 किमी रेंज
शाहीन-3, 2750 किमी रेंज
वार्षिक बजेट
2.46 लाख कोटी रुपये
78 हजार कोटी रुपये

राठोड यांनी दिला होता इशारा
केंद्रीय मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी बुधवारी इंडियन आर्मीच्या ऑपरेशनचे कौतुक करत असे म्हटले होते की, म्यानमारमध्ये करण्यात आलेले ऑपरेशन हे दहशतद्यांना आसरा देणाऱ्या शेजारी देशांसाठी एक इशारा आहे. भारत शत्रुच्या शोधासाठी सीमा पार करायला मागे पुढे पाहणार नाही. राठोड यांच्या या वक्तव्यानंतर मोदी सरकारच्या अनेक मंत्र्यांनीही त्याचे समर्थन केले होते. 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतरही भारतीय लष्कराने शेजारी देशाविरोधात अशी कारवाई करायला हवी, होती असेही काही मंत्री म्हणाले.
दिवसा स्वप्ने पाहू नका, पाकच्या मंत्र्यांचे वक्तव्य
पाकचे गृहमंत्री चौधरी निसार अली खान म्हणाले की, 'हिंदुस्तानी नेत्यांनी दिवसा स्वप्ने पाहणे बंद करावे. आम्हाला म्यानमार समजू नका. जर हिम्मत केली तर त्याचे परिणामही भोगावे लागतील. संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, अशा वक्तव्यांनी वातावरण खराब होते. भारताने सुरुवात केली तर आम्ही नक्की धडा शिकवू. पाकिस्तानचे विरोधीपक्ष नेते इम्रान खान यांनीही असाच सूर आळवला. पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांनीही धमकीच्या स्वरात म्हटले की, पाकिस्तानच्या सैन्याच्या हातात बांगड्या नाहीत, आणि आम्ही म्यानमारही नाही. भारताने इस्लामाबाबत काहीही गैरसमज बाळगू नये असेही ते म्हणाले.

पाकिस्तानी लष्करात मंथन
म्यानमारमधील ऑपरेशननंतर पाकिस्तानमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे. रावळपिंडीमध्ये लष्कराच्या मुख्यालयात लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ हे एका फॉर्मेशन कमांडोज कॉन्फरन्समध्ये सहभागी झाले. त्यानंतर पाकिस्तानी लष्कराच्या वतीने बोलताना ते म्हणाले की, भारताने केलेल्या कारवाईला आम्ही गांभीर्याने घेतले आहे. शत्रुंच्या विरोधात वक्तव्य आणि कारवायांद्वारे पाकिस्तानात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.

पाकिस्तानात अशा कारवाईच्या शक्यतेचे वास्तव
- पाकिस्तानकडे अण्वस्त्र आहेत हे खरे आहे.
- लष्करी सहकार्यासाठी भारताने म्यानमारबरोबर अनेक वर्ष प्रयत्न केले आहेत.
- दोन्ही देशांतील इतिहास आणि काश्मीरचा मुद्दा पाहता हे ऑपरेशन होणे कठीण आहे.
- भारताने जर पाश्चिमात्य सीमेवर अशाप्रकारे सीमोल्लंघन करून कारवाई केली तर ती पाकिस्तानविरोधात युद्धाची सुरुवात मानली जाईल.
- संख्येने अधिक असलेल्या भारतीय लष्कराच्या विरोधात पाकिस्तानने नेहमीच कडक भूमिका घेतली आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, मोदींच्या विरोधात कारवाईचा प्रस्ताव...