आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कर-सरकार मतभेदाचे वृत्त 100% खरे, तीनवेळा फॅक्ट्स चेक केले होते - PAK पत्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाक लष्कर आणि सरकार यांच्यात खळबळ उडवण देणारे वृत्त देणारे पत्रकार सेरिल अलमाडी यांनी त्यांचे वृत्त 100 टक्के खरे असल्याचा दावा केला आहे. - Divya Marathi
पाक लष्कर आणि सरकार यांच्यात खळबळ उडवण देणारे वृत्त देणारे पत्रकार सेरिल अलमाडी यांनी त्यांचे वृत्त 100 टक्के खरे असल्याचा दावा केला आहे.
इस्लामाबाद (पाकिस्तान) - नवाज शरीफ सरकार आणि पाकिस्तान लष्कर यांच्यात बरेच मतभेद असल्याचे वृत्त देणारे पत्रकार सेरिल अलमीडा यांच्या दाव्यात बरेच तथ्य होते. सेरिल यांच्या म्हण्यानुसार, एवढी महत्त्वाची बातमी देण्यापूर्वी त्यांनी अनेक तथ्य तीन-तीन वेळा तपासून पाहिले होते.
भारताने पीओकेमध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन'मध्ये प्रकाशित वृत्तात म्हटले होते, की नवाज शरीफ सरकारने आर्मीला दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करा अन्यथा आपण जगापासून वेगळू पडू, असे म्हटले होते.
सेरिलने लिहिले हा आठवडा कायम लक्षात राहिल...
- पाकिस्तानचे राजकारण ढवळून काढणारी सरकार आणि लष्कराच्या बेबनावाची बातमी प्रसिद्ध केल्यानंतर जवळपास एक आठवड्यानंतर सरिल अलमीडा यांनी 'द डॉन'मध्ये एक लेख लिहिला.
- या लेखाचे शिर्षक होते, 'एक आठवडा जो स्मरणात राहिल'. अलमाडीच्या वृत्तानंतर पाकिस्तान सरकारने त्यांच्या देश सोडून जाण्यावर बंदी घातली होती. मात्र देश-विदेशातून झालेल्या विरोधानंतर ही बंदी उठविण्यात आली.
- या लेखात अलमीडा म्हणाले, 'मी माझ्या बातमीवर आजही ठाम आहे. हे वृत्त प्रकाशित होण्यापूर्वी मी तीन-तीन वेळा सर्व तथ्य तपासून पाहिले होते. कारण मला कोणताही चान्स घ्यायचा नव्हता. कोणतीही चूक राहायला नको याकडे माझे लक्ष होते.'
तीन दिवसांनंतर दिली होती बातमी
- अलमाडी यांच्या म्हणण्यानुसार, 'सरकार आणि लष्करादरम्यान 3 ऑक्टोबर रोजी बैठक झाली होती. याची माहिती मला त्याच दिवशी मिळाली होती. मात्र आम्ही घाईघाईने वृत्त प्रकाशित केले नाही, तर 6 ऑक्टोबर रोजी त्याला प्रसिद्धी दिली. कारण आम्ही सर्व फॅक्ट्स एकदा नाही दोनदा नाही तर तीनवेळा चेक करण्याचे निश्चित केले होते, आणि त्यावर अधिकृत व्हर्जन हवे होते.'
- अलमाडीने त्या वृत्तात म्हटले होते, 'पाकिस्तान सरकारन लष्कराला सांगितले- बंदी असलेल्या सर्व दहशतवादी संघटना उदाहरणार्थ लष्कर आणि जैश यांच्याविरोधात कारवाई करा अन्यथा जगापासून वेगळे पडण्यास तयार राहा.' अलमाडींचे हे वृत्त सरकार आणि लष्कराने निराधार असल्याचे सांगत फेटाळले होते.

सरकार आणि लष्कराचा खोटारडेपणा
पाकिस्तान सरकार आणि लष्कराने एकीकडे ते वृत्त सपशेल खोटे असल्याचे सांगत फेटाळले होते, दुसरीकडे त्यांनी अलमाडी यांचे नाव एक्झिट कंट्रोल लिस्ट मध्ये टाकले होते. जेव्हा दबाव वाढला तेव्हा शुक्रवारी त्यांनी ही बंदी उठवली. एवढेच नाही तर अलमाडींचे वृत्त राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचा कांगावाही केला गेला होता.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, द डॉनमध्ये प्रकाशित वृत्त
> सत्य समोर आणण्याचा प्रयत्न
> काय आहे वाद
बातम्या आणखी आहेत...