आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK मध्ये कोर्ट परिसरात साखळी ब्लास्ट, 6 ठार, 30 जखमी, 3 आत्मघातकी हल्लेखोरांचा खात्मा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानातील चारसद्दा कोर्ट परिसर मंगळवारी 3 शक्तीशाली बॉम्बस्फोटांनी हादरला. यात 6 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. चारसद्दा खैबर पख्तूनख्वा प्रांतात हे साखळी स्फोट झाले. हल्लेखोर कोर्टात घुसण्याच्या प्रयत्नात होते. सुरक्षारक्षकांनी हल्लेखोरांचा कट उधळून लावत त्यांना कंठस्नान घातले. सुरक्षारक्षकांनी तिन्ही आत्मघातकी हल्लेखोरांचा खात्मा केला आहे.

पाक मीडियानुसार,  या साखळी स्फोटाची जबाबदारी जमात-उल-अहरार संघटनेने स्विकारली आहे. चारसद्दा, खैबर पख्तूनख्वा हे राजधानी पेशावरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे.
एका आत्मघातकी हल्लेखोराने हे स्फोट घडवून आणले आहे. पोलिसांनी त्याच्या दिशेने गोळीबार केला असता, त्याने स्वत:ला उडवून घेतले. पेशावरहून चारसद्दाकडे 10 अॅम्ब्युलन्स रवाना झाल्या आहेत.
- पाकमधील वृत्तपत्र 'डॉन'नुसार, सुरक्षारक्षकांनी तीन हल्लेखोरांचा खात्मा केला आहे. संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे. मृतांमध्ये एका वकीलाचा समावेश आहे. 
- 3 हल्लेखोर कोर्टाच्या मुख्यप्रवेशद्वारातून आत घुसण्याच्या प्रयत्नात होते. 
- हल्लेखोरांनी कोर्ट परिसरात अंदाधुंद गोळीबार करत ग्रेनेड्स फेकले. 
- सुरक्षारक्षकांनी हल्लेकोरांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात एक हल्लेकोर ठार झाला. दुसर्‍याला कोर्टाच्या प्रवेशद्वाराजवळ कंठस्नान घालण्यात आले. तर तिसर्‍या हल्लेखोराने स्वता:ला उडवून घेतले.
दरम्यान, शाहबाज कलंदर यांच्या दर्ग्यात झाला होता 100 जणांचा मृत्यू... 
- 16 फेब्रुवारीला ISIS हल्लेखोरांनी शाहबाज कलंदर यांच्या दर्ग्यात घडवून आत्मघातकी हल्ला घडवून आणला होता.  
- या हल्ल्यात 100 जणांचा मृत्यू झाला होता. तर 300 हुन जास्त जखमी झाले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...