आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घुसखोरी करणाऱ्या कमांडचे प्रमुख बाजवा पाकचे लष्करप्रमुख, पीओके व उत्तर भागातील अनुभव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कमर जावेद बाजवा यांना काश्मिर मुद्द्याचा मोठा अनुभव आहे. - Divya Marathi
कमर जावेद बाजवा यांना काश्मिर मुद्द्याचा मोठा अनुभव आहे.
इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांनंतर लष्करप्रमुखपदाचा बदल शांततापूर्ण मार्गाने होत आहे. ले. जनरल कमर जावेद बाजवा नवे लष्करप्रमुख होणार आहेत. पाक पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी शनिवारी ही घोषणा केली. बाजवा यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे संरक्षण करणाऱ्या लष्कराच्या १० कमांडचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. भारतात अतिरेक्यांची घुसखोरी करण्यात या कमांडचा हात असतो. जनरल बाजवा सध्या ट्रेनिंग अँड इव्हॅल्युएशनचे महानिरीक्षक आहेत. बाजवा मंगळवारी पदभार स्वीकारतील. याच दिवशी लष्करप्रमुख राहिल शरीफ निवृत्त होत आहेत.

कट्टरपंथ पाकसाठी धोक्याचा : कट्टरपंथ भारतापेक्षाही पाकिस्तानला जास्त धोकादायक असल्याचे त्यांचे मत आहे. त्यांच्यासोबत काम केलेला एक अधिकारी म्हणाला, बाजवा सरळ स्वभावाचे आहेत. प्रोटोकॉलला फार महत्त्व देणाऱ्यांपैकी ते नाहीत.

नवाझ यांना वाचवण्याच्या अटीवर पदोन्नती :
विश्लेषकांच्या मते, बाजवा यांना लष्करप्रमुख करण्याआधी नवाझ शरीफ यांनी त्यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. पनामा पेपर्समध्ये त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला वाचवण्याच्या आश्वासनाचा मुख्य मुद्दा होता. आश्वासन मिळाल्यानंतरच पदोन्नती देण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...