आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाझ शरीफ यांच्‍याविरोधात तक्रार, लष्‍कराविरोधात जनतेला चिथावल्याचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्‍लामाबाद- पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्‍या विरोधात पाकिस्‍तान पोलिसांत तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. लष्‍कराविरोधात जनतेला चिथावल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्‍हणजे एका व्‍हॉट्सअॅप व्हिडिओच्‍या आधारावर ही तक्रार दाखल करण्‍यात आली आहे. या व्हिडिओमध्‍ये शरीफ लष्‍कराविरोधात जनतेला चिथावणीखोर भाषण देत असताना दिसत आहे. 

रावळपिंडीत दाखल केली तक्रार...
- पाकिस्‍तानमधील वृत्‍तपत्र 'डॉन'ने याबाबत वृत्‍त दिले आहे. 'पाकिस्‍तानी लष्‍काराविरोधात जनतेला चिथावल्याचा आरोपाखाली रावळपिंडी पोलिसांनी नवाझ शरीफ यांच्‍याविरोधात तक्रार दाखल केली आहे.'
- अॅड. इश्तियाक अहमद मिर्झा यांनी ही तक्रार केली आहे. ते 'आयएम पाकिस्‍तान' या पक्षाचे अध्‍यक्ष आहेत. 

लष्‍कराविरोधात चिथावणीखोर वक्‍तव्‍य करत होते शरीफ...
- अॅड. मिर्झा यांनी आपल्‍या तक्रारीत म्‍हटले आहे की, 'ते डिस्ट्रिक्‍ट कोर्टातील आपल्‍या ऑफीसमध्‍ये बसलेले असताना त्‍यांना मोबाईलवर एक व्‍हॉट्सअॅप क्लिप आली. यामध्‍ये एक व्‍यक्‍ती लष्‍कराविरोधात चिथावणीखोर भाषण करताना दिसत होती.'  
- व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिल्‍यानंतर ते नवाझ शरीफ असल्‍याचे त्‍यांच्‍या निदर्शनास आले. व्हिडिओमध्‍ये शरीफ लष्‍काराविरोधात चिथावणीखोर वक्‍तव्‍य करत होते. जनतेला लष्‍काराविरोधात भडकावण्‍याचे ते प्रयत्‍न करत असल्‍याचे स्‍पष्‍ट दिसत होते. 

पनामा पेपर्स लीकमुळे शरीफ आधीच अडचणीत 
- 'पनामा पेपर्स लीक' प्रकरणामुळे शरीफ व त्‍यांचे कुटुंबीय याआधीच अडचणीत सापडले आहेत. 
- या प्रकरणात शरीफ यांच्‍यावर भ्रष्‍टाचाराचा आरोप ठेवण्‍यात आले आहे. सुप्रीम कोर्टात याप्रकरणी सुनावणी सुरु असून 20 एप्रिलला सुप्रीम कोर्टाने आरोपांच्‍या चौकशीसाठी जॉईंट इन्व्‍हेस्टिगेशन टीमची (जेआयटी) स्‍थापना केली आहे. 
- कोर्टाने शरीफ आणि त्‍यांच्‍या दोन मुलांना (हसन आणि हुसैन) जेआयटीसमोर हजर राहण्‍याचे आदेशही दिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...