आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pak Ready To Hold Talks With India: Nawaz Sharif

भारताशी विनाअट चर्चेस तयार, काश्मीर मुद्दा रेटणाऱ्या शरीफ यांचा यूटर्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वालेटा - स्थायी शांततेसाठी भारताशी विनाशर्त चर्चेस तयार अाहोत, असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी म्हटले आहे. ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरूनसोबत चर्चेत त्यांनी हे मान्य केले.
शरीफ यांनी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्र अधिवेशनात भारत-पाकिस्तान चर्चेत काश्मीर मुद्दा अनिवार्य असावा, यासह चार अटी ठेवल्या होत्या. आता मात्र त्यांनी घूमजाव केले. राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांच्या बैठकीसाठी शरीफ व कॅमरून माल्टा देशाची राजधानी वालेटा येथे अाले आहेत. शरीफ म्हणाले, पाकिस्तान भारतासोबत विनाशर्त चर्चेस तयार आहे, जेणेकरून प्रदेशात शांतता निर्माण होऊन स्थिरता येऊ शकेल. बैठकीत भारताकडून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सहभागी होतील.