आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेक्यांची ठिकाणे नष्ट केल्याचा दावा, ३५०० अतिरेक्यांना ठार केले, आता इसिसच्या धमक्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाक लष्कराने ३,५०० दहशतवाद्यांना ठार केल्याचे म्हटले आहे. आणि अमेरीकेच्या दबावापुढे झुकून का असेना पाक लष्कराने थातूरमातूर कारवाई करून दहशतवाद्यांची सर्वच ठिकाणे नष्ट करून संघटित दहशतवादाचा विनाश केल्याचा दावा केला आहे.

लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल असीम सलीम बाजवा पत्रकारांना संबोधित करताना म्हणाले की,दहशतवाद्यांविरुद्धच्या झर्ब अझ्ब, या नावाच्या जून २०१४ ऑपरेशनद्वारे लष्कराला मोठे यश मिळाले आहे. आता पाकिस्तानातील कुठल्याही भागात लपूनछपून कार्यरत असणारे देखील अतिरेकी गट नाहीत. आम्ही सर्वच अतिरेक्यांसह सर्वच दहशतवादी ठिकाणांचा खात्मा केला आहे. या मोहिमेत साडेतीन हजार अतिरेक्यांसह ५३७ सैनिकांनाही या मोहिमेत जीव गमवावा लागला. तसेच २,२७२ जण जखमी झाले. या मोहिमेदरम्यान ३११ बॉम्बस्फोट, ७४ हल्ले आणि २६ आत्मघातकी हल्ले झाले होते. यासह मोठ्या प्रमाणात २१ वर्षे पुरेल एवढे स्फोटकांचे साहित्य जप्त केले.

असीम सलीम बाजवा पुढे म्हणाले, आमच्यापुढे दोन आव्हाने होती पहिले २६०० किलोमीटरची अफगाणिस्तान सीमेचे दहशतवादी घुसखोरीपासून संरक्षण करणे तसेच दुसरे आव्हान दशलक्ष अफगाणी निर्वासितांना परत अफगाणिस्तानात पाठविणे. सीमेवरील उणिवा झाकण्यासाठी १८ नियमित क्रॉसचेकिंगचे पॉईंट्स बसविणे. आम्ही जैश या अतिरेकी संघटनेचा खात्मा करुन त्यातील २० ते २५ अतिरेक्यांना पकडले आहे ज्यात जैशचा प्रमुख हाफिझ उमर याचा देखील समावेश आहे. ३०९ जैश(इसिसची शाखा)च्या देशभरातील समर्थकांना स्थान बध्द केले आहे. आता आम्हाला इसिसकडून धमक्या येत आहेत. आता जी थोडीबहुत अफगाणिस्तानच्या सीमेवरील कुनार, नांगरहार आणि खोस्त या तीन प्रांतातच शिल्लक आहे.
बातम्या आणखी आहेत...