इस्लामाबाद- पाकिस्तान सरकारने मुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यातील मास्टरमाइंड हाफीज मोहम्मद सईदची संघटना जमात-उद-दावाचा संशयितांच्या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे यापुढे या दहशतवादी संघटनेच्या अॅक्टीव्हिटीवर नजर ठेवली जाणार आहे. पाकिस्तानने हा निर्णय दोन्ही देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या भेटीची तारीख घोषित करताना घेतला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधानांचे परराष्ट्र सल्लागार आणि एनएसए (राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार) सरताज अजिज यांनी या बैठकीसाठी गुरुवारी २३ ऑगस्टला दिल्लीला येणार असल्याचे म्हटले आहे.
काही चुकीचे आढळल्यास कारवाई
पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाचे राज्यमंत्री बलीगुर रेहमान यांनी देशातील संसदेच्या वरीष्ठ सभागृहाला गुरुवारी जमात-उद-दावावर झालेल्या कारवाईची माहिती दिली. ते म्हणाले की, जर संघटना चॅरिटीशिवाय इतर एखाद्या चुकीच्या कामांमध्ये सहभागी असले तर त्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. यूएन रेझोल्युशन 1267 अंतर्गत जमात-उद-दावा एक बंदी घातलेली संघटना आहे. ही संघटना लश्कर ए तोयबा संघटनेचा मुखवटा असल्याचे मानले जाते. लश्करने या संघटनेच्या मदतीने भारतातही अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत.