आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिरेक्यांशी संबंधित मदरशांना पाककडून ३० कोटींची मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - पाकिस्तानमध्ये खैबर पख्तुनख्वा प्रांतातील सरकारने अतिरेक्यांशी संबंधित मदरशांना ३० कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. ही घोषणा राज्याचे अर्थमंत्री शाह फरमान यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना केली. तालिबान अफगाणिस्तानशी संबंधित मदरशांना जिहादींचे विद्यापीठ संबोधले जाते.

अर्थमंत्री म्हणाले, दारुल उलूम हक्कानिया नौशेराला वार्षिक खर्चासाठी ३० कोटी रुपये दिले जात आहेत याची घोषणा करताना मला अभिमान वाटतो. विशेष म्हणजे पाकिस्तानला अमेरिकेच्या आर्थिक मदतीआड येणारी हक्कानी नेटवर्क हीच संघटना आहे. पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कविरुद्ध पावले उचलावीत, असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

शाह फरमान म्हणाले, खैबर पख्तुनख्वामध्ये इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे सरकार धार्मिक संस्थांवर धाड टाकणार नाही. एखाद्या मदरशाला सर्वात जास्त निधी का दिला जात आहे, या प्रश्नावर धार्मिक प्रकरणांचे मंत्री हबीबूर रहमान म्हणाले, मुख्यमंत्री परवेझ खटक यांनी हक्कानिया मदरशा प्रशासनास १५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. रहमान जमात-ए-इस्लामी पक्षाचे सदस्य आहेत. ते म्हणाले, दारुल उलूम हक्कानिया पाकिस्तानमधील सर्वात मोठा मदरसा आहे आणि सरकारी मदतीचा हक्कदार आहे.

या मदरशांत शिकले अनेक कुख्यात अतिरेकी
तालिबानचा म्होरक्या मुल्ला उमर(त्यास मानद डॉक्टरेट देण्यात आली), अमेरिकी ड्रोन हल्ल्यात ठार झालेला मुल्ला अख्तर मन्सूर, हक्कानी नेटवर्कचा संस्थापक जलालुद्दीन हक्कानी, अल कायदा भारतीय उपखंडाचा म्होरक्या असीम उमर.

हाफिज सईद आणि प्रतिबंधित संघटनांशी नाते
हक्कानिया मदरशाची स्थापना १९४७ मध्ये झाली. त्याचा अध्यक्ष जमियत-उलेमा-ए-इस्लामचा नेता मौलाना समी उल हक आहे. तो ४० संघटनांचा गट दिफा-ए-पाकिस्तानचा अध्यक्ष होता. त्यात मुंबईवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदची जमात-उद-दावा आणि प्रतिबंधित अतिरेकी संघटना सिपह-ए-सहाबाचाही समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...