आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंतरराष्ट्रीय पत्रकारांना बॉर्डरवर घेऊन गेली पाक आर्मी, म्हणाले- दाखवा कुठे झाला सर्जिकल हल्ला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंढोले (पाकिस्तान) - पीओकेमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी केलेली कारवाई नाकारणाऱ्या पाकिस्तान आर्मीने पत्रकारांच्या एका गटाला नियंत्रण रेषेजवळ नेले आणि तेथिल स्थितीबद्दल माहिती दिली. दोन्ही देशांदरम्यान वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांचा दावा आहे की त्यांच्या सीमेत घुसून कोणतीही कारवाई होणे अशक्य आहे.
भारताकडून सर्जिकल अटॅक झाल्याचे सांगितले जात असताना पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पत्रकारांच्या एका गटाला तेथील सध्याची स्थिती काय आहे याची माहिती दिली. भारताकडून सांगितले गेले होते की त्यांच्या जवानांनी पाकिस्तानच्या सीमेत घुसून दहशतवादी तळ उद्धवस्त केले. हे पाकिस्तान आर्मीने सपशेल नाकारले आहे.
2011 मध्ये अमेरिकन आर्मीने पाकिस्तानातील ऐबटाबाद येथे घुसून कुख्यात दहशतवादी ओसामा बीन लादेलना ठार केले होते, त्यानंतर आता भारताने दहशतवादी तळ उद्धवस्त केल्याचा दावा केल्याने पाकिस्तानची जगासमोर नाचक्की झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...