आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बनावट कागदपत्रे; १६ बांगलादेशींवर पाकमध्ये कारवाई

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानच्या सर्वोच्च हेर संस्थेने बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या १६ बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली आहे. त्यांचे दस्तऐवज जप्त करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली. पाकिस्तानी नागरिकत्वाची बनावट कागदपत्रे त्यांच्याजवळ होती. ते अवैधरीत्या पाकमध्ये तळ ठोकून होते. द फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एफआयए)ने ही कारवाई केली. फैसलाबाद जिल्ह्यातून त्यांना ताब्यात घेण्यात आले. आता त्यांची चौकशी केली जाईल.
कॉम्प्युटराइज्ड नॅशनल आयडेंटिटी कार्डच्या आधारे ते येथे राहत होते. या बांगलादेशी नागरिकांना मदत करणाऱ्या ३ पाकिस्तानी नागरिकांनाही अटक केले. एफआयएने सध्या अवैध मार्गाने देशात राहणाऱ्यांविरुद्ध धडक कृती कार्यक्रम हाती घेतला असल्याचे वरिष्ठ अधिकारी अली इमाम झैदी यांनी सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...