आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवादी हल्ल्याची धमकी; पाकिस्तानात 'योग दिन'च रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानातील चार शहरांत आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रविवारी आयोजित करण्यात आलेले विविध कार्यक्रम दहशतवादी हल्ल्याची शक्यता व इशारा लक्षात घेऊन रद्द करण्यात आले आहेत.

पाकिस्तान सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव हे कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेला या कार्यक्रमांचे आयोजन रद्द करण्याची सूचना केली होती. संघटनेच्या वतीने लाहोर, कराची, इस्लामाबाद व फैसलाबाद या शहरांत शाळकरी मुलांसाठी रविवारी योग दिनानिमित्त योग वर्गाचे आयोजन केले होते. त्याची शाळांनी तयारीदेखील केली हाेती. परंतु आता ते रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.