आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्तानमध्ये दोन टीव्ही चॅनेलचे परवाने रद्दबातल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानमध्ये न्यायपालिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या तीन टीव्ही चॅनेलच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी दोन चॅनेलचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, तर तिसऱ्या चॅनेलला दंड सुनावण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर लक्ष ठेवणाऱ्या ‘पेमरा’ या नियंत्रकाने ही शिक्षा सुनावली आहे.

या टीव्ही चॅनेलनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालावर टिप्पणी केली होती. ती तथ्यहीन आहे, असे सांगण्यात आले. दिन न्यूज आणि नियो टीव्हीचे परवाने निलंबित करण्यात आले असून त्यांना १० लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. सच टीव्हीवर एका प्रेक्षकाचे विचार ऐकवल्याच्या आरोपावरून १० लाखांचा दंड सुनावण्यात आला आहे. ‘पेमरा’ने म्हटले आहे की, तिन्ही टीव्ही चॅनेल्सना बेजबाबदार विश्लेषण केल्याबद्दल १९ नोव्हेंबर रोजी नोटीस जारी करण्यात आली होती. त्यांच्याकडून २६ नोव्हेंबरपर्यंत उत्तर मागवण्यात आले होते, पण त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.

दिन न्यूजचा परवाना ३० दिवस, तर नियो टीव्हीचा परवाना सात दिवसांसाठी निलंबित करण्यात आला आहे. याआधी अधिकाऱ्यांनी अवैध डीटीएच सेवेवर बंदी घातली होती आणि केबल ऑपरेटर्सनी देशव्यापी विरोध केल्यानंतरही तीन डीटीएच परवान्यांचा लिलाव केला होता.
बातम्या आणखी आहेत...