आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानच्‍या मार्केटमध्‍ये बॉम्बस्‍फोट, 23 ठार, 50 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - पाकिस्तानमधील आदिवासी भागातील कपड्यांच्या बाजारात करण्यात आलेल्या बॉम्बस्फोटात २३ नागरिक ठार, तर ५५ जखमी झाले. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या वायव्य पाकिस्तानातील पाराचिनारमधील ही घटना आहे. या भागातील हा सर्वांत मोठा कपड्यांचा बाजार समजला जाताे आणि याठिकाणी वापरलेल्या कपड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. रविवारी या बाजारात प्रचंड गर्दी असते. नेमक्या याच संधीचा फायदा उचलत दहशतवाद्यांनी याठिकाणी हा हल्ला घडवून आणला. कुरमचे राजकीय व्यवस्थापक अमजद अली खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यातील ५५ जखमींपैकी १५ जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना पाराचिनार येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र, हा बॉम्बस्फोट नेमका कसा घडला याचा शोध लागलेला नाही. कोणत्याही संघटनेने जबाबदारी स्वीकारलेली नाही.
जर्ब ए अज्ब मोहीम
लष्कराने या भागात सक्रिय असलेल्या पाकिस्तानी तालिबान आणि अन्य दहशतवादी संघटनांविरोधात "जर्ब ए अज्ब' हे अभियान सुरू केले आहे. लष्कराच्या या कारवाईला विरोध करण्याच्या उद्देशानेच दहशतवाद्यांनी हा हल्ला घडवून आणल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, मार्केट परिसरातील फोटो, VIDEO..