आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्‍तानमध्‍ये बसमधील स्फोटात १६ सरकारी कर्मचारी ठार, ३० जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटानंतर बस अशी छिन्नविछिन्न झाली होती. - Divya Marathi
स्फोटानंतर बस अशी छिन्नविछिन्न झाली होती.
पेशावर - सरकारी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला बॉबस्फोटाने उडवून देण्यात आल्याची घटना बुधवारी पाकिस्तानातील वायव्य प्रांतात घडली. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला. ३० कर्मचारी जखमी झाले. मृतांत ३ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

चाकरमान्यांनी खचाखच भरलेली ही बस मार्दनहून पेशावरला जात होती. ही गाडी सचिवालयातील कर्मचाऱ्यांना घेऊन जात असतानाच वाहनात स्फोट झाला. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्य केले. बसमधून ५० कर्मचारी कार्यालयात पोहोचण्यासाठी लगबग करत असताना हा रक्तपात घडून आला. स्फोट एवढा भयंकर होता की, त्यात गाडीच्या संपूर्ण छताचे तुकडे होऊन ते उडून बाहेर पडले. त्यात वाहनाचा मोठा भाग जळाला. ३० जखमींना उपचारासाठी लेडी रीडिंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी बहुतेकांची स्थिती गंभीर असल्याची माहिती पोलिस अधीक्षक काशिफ झुल्फिकार यांनी दिली. आठ जणांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. घटनेनंतर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणेने परिसराची तपासणी केली. आतापर्यंत कोणत्याही दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. दरम्यान, पेशावरमध्ये अनेक वेळा दहशतवादी स्फोट घडवण्यात आले आहेत, परंतु सरकारी कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या स्फोटानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. दहशतवादाच्या विरोधातील लढाई अशा कृत्यांमुळे कदापिही थांबवण्यात येणार नाही.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज....