इस्लामाबाद/नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान दरम्यान उद्या(शुक्रवार)होणा-या परराष्ट्र सचिव पातळीवरील चर्चा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते काझी खलीउल्लाह यांनी सांगितले, की चर्चेसाठी नवीन तारखा निश्चित करण्यासाठी भारताशी चर्चा चालू आहे.
चर्चेसाठी पाकिस्तान भारताला काय म्हणाले होते...
- नुकतेच भारताने स्पष्ट केले होते, की चर्चा व्हावी. पाकिस्तानने 2 जानेवारी रोजी झालेल्या पठाणकोठ हल्ला रचणा-या हल्लेखोरांविरुध्द कारवाई करावी.
- या हल्ल्यात सात जवान शहीद झाले होते तर 22 जण जखमी.