इस्लामाबाद - भारताच्या तीव्र विरोधानंतर पाकिस्तानने इस्लामाबादेत पुढील महिन्यात होणारी कॉमनवेल्थ पार्लियामेंट्री युनियन मिंटींग रद्द केली आहे. ही बैठक आता इस्लामाबादऐवजी न्यूयॉर्कमध्ये आयोजित केली जाणार आहे. गुरुवारी पाकिस्तानच्या नॅशनल असेम्बलीचे स्पिकर सरदार अयाज सादीकने ही माहिती दिली.
30 सप्टेंबरपासून आठ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत पाकिस्तानने जम्मू-काश्मीर विधानसभेचे सभापती कविंद्र गुप्ता यांना निमंत्रण द्यायला नकार दिला होता. त्यावर भारताने तीव्र आक्षेप नोंदवला होता. तसेच प्रसंगी या परिषगदेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही भारताकडून पाकिस्तानला देण्यात आला होता.
पाकिस्तानने पुन्हा अळवला काश्मीर राग
सादिक म्हणाले, "आम्ही कॉमनवेल्थ नेशन्सच्या लंडन ऑफिसला याबाबत स्पष्टपणे कारण दिले होते. काश्मीर एक वादग्रस्त भाग आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या विधानसभा अध्यक्षांना निमंत्रण पाठवणे आमच्यासाठी अशक्य असल्याचे पाकने म्हटले होते. तसेच या प्रकरणी कॉमनवेल्थ नेशन्सला एक पत्र लिहिले जाणार आहे. ते म्हणाले, भारताचा या परिषदेत सहभागी होण्याची शक्यता कमी झाली होती. त्यामुळे ही बैठक आतात न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच पंजाब आणि जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या मुद्यांवरून दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.