आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात श्रीमंत- गरिबीत आजही प्रचंड दरी, 70 वर्षानंतरही स्थिरावला नाही देश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तान आज 70 वा स्वातंत्र दिन साजरा करत आहे त्यानिमित्त पाकिस्तानात चीनचे उपराष्ट्राध्यक्ष वॅंग यान हजर झाले आहेत. - Divya Marathi
पाकिस्तान आज 70 वा स्वातंत्र दिन साजरा करत आहे त्यानिमित्त पाकिस्तानात चीनचे उपराष्ट्राध्यक्ष वॅंग यान हजर झाले आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1947 साली फाळणी झाली. पाकिस्तान 14 ऑगस्ट 1947 रोजी तर भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र देश बनले. गेल्या 70 वर्षात अनेक युद्ध झाले; द्विपक्षीय वाटाघाटी झाल्या. परंतु आजही भारत-पाकिस्तान परस्परांना शत्रू मानतात. भारत काश्मिरातील पाकिस्तानी हस्तक्षेपावर आक्षेप घेतो, तर पाकिस्तान काश्मिरातील मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा ठपका भारतावर ठेवत असतो. तरीही पाकिस्तानपेक्षा ब-याच क्षेत्रात मोठी मजल मारली आहे. सर्वात महत्त्वाचे भारतीय लोकशाही मजबूत स्थितीत आहे तर पाकिस्तानात लष्कराचे वर्चस्व राहते व त्यांच्या कलानुसार लोकशाही सरकारे येतात व जातात. अमेरिकेच्या सांगण्यावरून पाकिस्तानने जो दहशतवाद जोपासला आता तोच दहशतवाद पाकिस्तानच्या मूळावर उठला आहे. आज पाकिस्तान 70 वा स्वतंत्र दिन साजरा करत आहे त्यानिमित्त पाकिस्तान देशांबाबत  थोडक्यात माहिती घेणार आहोत....
 
पाकिस्तानात ना धड लोकशाही ना ठोस राष्ट्रीय पक्ष-
 
- सध्या पाकिस्तानात नवाझ शरीफ यांचा पक्ष सत्तेत आहे. नवाझ व त्यांच्या पक्षाचा प्रभाव पंजाब प्रांतात आहे. नवाझ यांचा हा बालेकिल्ला मानला जातो. इथेच पाकची बहुतांश लोकसंख्या आहे. माझी दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांचा पीपीपी सिंध प्रांतात प्रभावी आहे. इम्रान खानचा तेहरिक-ए-इन्साफ खैबर पख्तुनवामध्ये लोकप्रिय आहे. इतरही अनेक धार्मिक समूहांचे लहान लहान पक्ष आहेत. अशा प्रकारे स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही पाकिस्तानात ठोस राष्ट्रीय पक्ष नाही. लष्कर, आयएसआय आणि कट्टरपंथीयांचा हस्तक्षेप आणि लष्कराच्या तीन कार्यकाळांमुळे देशाचा राजकीय विकासच खुंटला आहे. त्यामुळे तेथे ना धड लोकशाही आहे ना हुकुमशाही अशीच आजची स्थिती आहे.
 
पाकिस्तानचे लष्कर सर्वात सुखी-
 
- पाकिस्तानात सर्वात सुखी आहे लष्कर. त्याचे वार्षिक बजेट 8 अब्ज डॉलर शिवाय सैनिकांना उच्च निवृत्तिवेतन वेगळेच. 
- लष्कर संचालित अनेक उद्योग आणि सैनिकी संस्थाही आहेत. डिफेन्स हाउसिंग अथॉरिटीच्या ताब्यात शहरातील मोठा भूभाग आहे. 
- एवढे दडपण असूनही पाकिस्तानमधील सार्वजनिक जीवन जिवंत आहे. गेल्या वर्षी ‘डॉन’ वृत्तपत्राने लष्कर आणि राजकारण्यांदरम्यानच्या गुप्त बैठकांचा पर्दाफाश केला होता. 
- राजकीय नेत्यांनी लष्कराला इशारा दिला होता की, त्यांनी धार्मिक कट्टरवाद्यांवर नियंत्रण न ठेवल्यास पाकिस्तान एकाकी पडेल.
- भारतापेक्षा पाकिस्तानमध्ये अब्जाधीशांचे प्रमाण कमी आहे, मात्र जहागीरदारी थाट खोलवर रुजलेला आहे. 
 
बलुचिस्तानला हवंय स्वातंत्र्य-
 
- पाकिस्तानी लष्कराला आपल्या वायव्य सीमेच्या आघाडीवर बराच संघर्ष करावा लागत आहे. या प्रांतातील कित्येक गावे लढाईच्या नावाखाली पाकिस्तानी सैनिकांनी उद्ध्वस्त केली आहेत.
 - याचे कारण पाकिस्तानात झालेला असमतोल व कमीअधिक विकास. लाहौर, कराची भाग सुधारलेला तर बलुचिस्तानसारख्या प्रदेशात प्रचंड गरिबी आहे.
- पाकिस्तानचा 43 टक्के भूभाग बलुचिस्तानमध्ये समाविष्ट असून स्वातंत्र्यापासून तिथे विद्रोह सुरू आहे. पाकमधील अनेक राज्यांमध्ये श्रीमंत-गरिबांमधील दरी कायम आहे. 
- पाकिस्तानच्या बलुचिस्तानातील 90 टक्के लोक गरीब असून तुलनात्मकदृष्ट्या लाहोरमध्ये ही स्थिती 10 टक्के इतकी आहे. 
- बलूचिस्तानमध्‍ये अनेक पर्यटन स्‍थळं आहेत. पूर्वी या ठिकाणी देश विदेशातून पर्यटक येत असत. मात्र, पाकिस्‍तानी सैन्‍याकडून येथे आत्‍याचार वाढला आहे. त्‍यामुळे पर्यटकांची संख्‍याही रोडावली आहे.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, सुंदर व निसर्गरम्य बलूचिस्तानमधील पर्यटन स्‍थळांचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...