आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्‍तान : भगतसिंग यांचा खटला वरिष्ठ पीठाकडे सुपूर्द

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - महान स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या फाशीला ८५ वर्षे उलटल्यानंतर त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी दाखल याचिकेची सुनावणी आता वरिष्ठ पीठ करणार आहे. बुधवारी लाहोर उच्च न्यायालयातील दोन न्यायमूर्तींच्या पीठाने वरिष्ठ पीठ स्थापन करण्यासाठी प्रकरण मुख्य न्यायमूर्ती एजाजुल अहसान यांच्याकडे पाठवले.

भगतसिंग यांना २३ मार्च १९३१ रोजी ब्रिटिश पोलिस अधिकारी सँडर्सच्या हत्येत दोषी ठरवून फाशी देण्यात आली होती. लाहोरचे वकील इम्तियाज रशीद कुरेशी यांनी याप्रकरणी भगतसिंग यांना निर्दोष घोषित करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. प्रकरणाची शेवटची सुनावणी मे २०१३ मध्ये झाली होती. तेव्हा त्यांनी प्रकरण मुख्य न्यायमूर्तींकडे वरिष्ठ पीठ स्थापन करण्यासाठी पाठवले होते. मुख्य न्यायमूर्ती एजाजुल अहसान यांनी न्या. खालिद महमूद खान यांच्या अध्यक्षतेखाली दोन सदस्यांचे पीठ स्थापन केले होते. बुधवारच्या सुनावणीमध्ये याचिकाकर्ते कुरेश म्हणाले, भगतसिंग यांना तीन न्यायाधीशांच्या पीठाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पाचपेक्षा कमी न्यायमूर्तींच्या पीठाकडून होऊ नये.

आधी जन्मठेपेची शिक्षा : तीन न्यायमूर्तींच्या पीठाच्या निकालाविरुद्ध सुनावणी तीनपेक्षा जास्त न्यायमूर्तींचे पीठ करू शकते. कुरेशी यांच्या याचिकेत म्हटले की, भगतसिंग यांना या प्रकरणात कट करून अडकवण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना आधी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर शिक्षा फाशीत बदलण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...