आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीओकेत भारताचे 3 रॉ एंजट पकडले, पाकिस्तानी माध्यमांचा दावा, अब्बासपूर बॉम्बस्फोटाचे आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली / इस्लामाबाद - पाकिस्तान व्याप्त काश्मिरात पोलिसांनी कथितरीत्या 3 रॉ एजंट पकडले असा दावा पाकिस्तानकडून केला जात आहे. पाकिस्तानी माध्यमांवर दिले जात असलेल्या वृत्तानुसार, या तिघांवर पाकविरोधी हालचाली आणि दहशतवादाचे आरोप लावण्यात आले आहेत. 
 
संशयितांना माध्यमांसमोर आणले
- पाकिस्तानी दैनिक डॉनने शनिवारी दिलेल्या वृत्तानुसार पाकव्याप्त काश्मिरात 3 जणांना भारतीय गुप्तचर संस्था रॉ चे एजंट असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या इतर माध्यमांनी सुद्धा सकाळपासूनच हे वृत्त लावून धरले. या तिन्ही संशयितांना रावलकोट येथे माध्यमांसमोर आणण्यात आले. तिन्ही संशयित पीओकेतील अब्बासपूर येथील रहिवासी आहेत. 
 
बॉम्बस्फोट घडवल्याचे आरोप
- पाकिस्तानी माध्यमांशी संवाद साधताना तेथील पोलील उपाधीक्षक साजिद इमरान म्हणाले, की संशयितांपैकी एक खलील हा 2014 मध्ये काश्मिरात आला होता. याच ठिकाणी तो कथितरीत्या रॉच्या संपर्कात आला. 
- सप्टेंबर महिन्यात अब्बासपूर येथे झालेल्या बॉम्बस्फोटात या तिघांचा समावेश होता असे आरोप संबंधित पाकिस्तानी अधिकाऱ्याने केला. बॉम्बस्फोटात आयईडी लावण्यासाठी त्यांना 5 लाख रुपयांची ऑफर देण्यात आली होती असा दावा पाकने केला आहे.
 
स्थानिकांनी तिघांना पाहिल्याचा दावा
- अटक करण्यात आलेल्या तिघांना बॉम्बस्फोटाच्या वेळी घटनास्थळी पाहिल्याचा दावा तेथील स्थानिकांनी केला अशी बातमी पाक माध्यमांनी शनिवारी जाहीर केली. अब्बासपूर येथे 26 सप्टेंबर रोजी झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेळी तिघांच्या हातात कॅरीबॅग होत्या. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी घेतल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असेही पाकिस्तानी माध्यमांनी स्पष्ट केले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर  
करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...