आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान काळा पैसा आता करणार पांढरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - परदेशात दडवून ठेवलेला काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रस्तावावर पाकिस्तान सरकार काम करत आहे. विदेशी कंपन्यांतील अघोषित संपत्तीवर दंड न आकारता फक्त १५ टक्के कर लावला जाईल.

एका अधिकाऱ्याने ‘डॉन’ या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, यासंबंधीच्या पॅकेजची घोषणा आॅगस्टमध्ये केली जाईल. केंद्रीय महसूल मंडळ, सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशन ऑफ पाकिस्तान आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तान या पॅकेजला अंतिम रूप देत आहेत. परदेशात दडवलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी १५ टक्के कर आकारण्यात यावा, कुठलाही दंड लावू नये, असा प्रस्ताव कर सुधारणा आयोगाने मांडला आहे. पनामा पेपर्स लीक होण्यापूर्वीच आयोग या प्रस्तावावर काम करत आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. परदेशातील संपत्ती जाहीर करणे आणि विदेशी चलनावरील नियंत्रण यासाठी प्रस्तावित पॅकेजमध्ये दोन कायद्यांचा समावेश करण्यात येईल. एका कायद्यानुसार, परदेशातील संपत्ती,उत्पन्न घोषित न करणाऱ्या लोकांना कायदेशीर संरक्षण दिले जाईल. परदेशातील संपत्ती जाहीर करण्यासंबंधीचा सध्या कायदा नाही.
पुढेे वाचा... बांगलादेशात ७० वर्षीय हिंदू पुजाऱ्याची हत्या
बातम्या आणखी आहेत...